• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. breakup signs or divorce signs husband wife boyfriend girlfriend relationship tips ndj

Breakup Signs : जर ही लक्षणे दिसत असतील, तर तुमचे नाते फार काळ टिकणार नाही

कोणतंही नातं सुरुवातीला खूप गोड वाटतं; पण जसजसा काळ आणि वेळ जातो, तसा जोडीदाराचा खरा स्वभाव समजतो आणि नात्यात अनेक गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात. ही लक्षणं वेळीच ओळखणं गरजेचं आहे; नाही तर नातं फार काळ टिकू शकत नाही.

Updated: September 1, 2023 19:12 IST
Follow Us
  • बॉयफ्रेंड वा गर्लफ्रेंड असो किंवा नवरा-बायकोचं नातं असो; जर नात्यात एकमेकांविषयी प्रेम, काळजी, जिव्हाळा, समजूतदारपणा दिसत नसेल, तर नातं लवकर तुटू शकतं. (Photo : Freepik)
    1/9

    बॉयफ्रेंड वा गर्लफ्रेंड असो किंवा नवरा-बायकोचं नातं असो; जर नात्यात एकमेकांविषयी प्रेम, काळजी, जिव्हाळा, समजूतदारपणा दिसत नसेल, तर नातं लवकर तुटू शकतं. (Photo : Freepik)

  • 2/9

    कोणतंही नातं सुरुवातीला खूप गोड वाटतं; पण जसजसा काळ आणि वेळ जातो, तसा जोडीदाराचा खरा स्वभाव समजतो आणि नात्यात अनेक गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात. ही लक्षणं वेळीच ओळखणं गरजेचं आहे; नाही तर नातं फार काळ टिकू शकत नाही. (Photo : Freepik)

  • 3/9

    जर तुमचा जोडीदार वारंवार तुमचा विश्वासघात करीत असेल, तर वेळीच सावध व्हा! कारण- असं नातं फाळ काळ टिकू शकत नाही. (Photo : Freepik)

  • 4/9

    कोणत्याही नात्यामध्ये संवाद हा खूप महत्त्वाचा घटक आहे. जर दोन व्यक्तींमध्ये संवाद नसेल, तर नात्यामध्ये अनेक गैरसमज निर्माण होऊ शकतात; ज्यामुळे नातं तुटण्याची शक्यता आणखी वाढते. (Photo : Freepik)

  • 5/9

    नवरा-बायको किंवा गर्लफ्रेंड वा बॉयफ्रेंडच्या नात्यामध्ये छोटी-मोठी भांडणं होत असतात. पण, जर नात्यामध्ये संवाद कमी आणि भांडणं जास्त होत असतील, तर ही चिंतेची बाब आहे. (Photo : Freepik)

  • 6/9

    ज्या नात्यामध्ये एकमेकांविषयी भावना उरत नाहीत, ते नातं फार काळ टिकू शकत नाही. एकमेकांच्या भावना समजून घेणं, एकमेकांविषयी काळजी, प्रेम, जिव्हाळा नसेल, तर नातं तुटण्याच्या मार्गावर असू शकतं. (Photo : Freepik)

  • 7/9

    जर तुमचा जोडीदार तुमच्यावर शारीरिक हिंसाचार किंवा मानसिक अत्याचार करीत असेल, तर अशा जोडीदाराबरोबर राहणं चुकीचं आहे. या नात्यातून लवकरात लवकर बाहेर पडा. (Photo : Freepik)

  • 8/9

    कोणतंही नातं फक्त प्रेमावर टिकत नाही. नात्यात एकमेकांविषयी आदर-सन्मान असणं तितकंच गरजेचं आहे. जर जोडीदार तुमचा वारंवार अपमान करीत असेल, तुम्हाला तुच्छतेची वागणूक मिळत असेल, तर अशा नात्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे. (Photo : Freepik)

  • 9/9

    जर नात्यामध्ये गैरसमज होत असतील आणि नातं तुटण्याच्या मार्गावर असेल तरीसुद्धा तुम्ही किंवा तुमचा जोडीदार नातं सुधारण्याचा प्रयत्न करीत नसाल, तर समजावं की हे नातं फार काळ टिकू शकत नाही. (Photo : Freepik)

TOPICS
रिलेशनशिपRelationshipलाइफस्टाइलLifestyle

Web Title: Breakup signs or divorce signs husband wife boyfriend girlfriend relationship tips ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.