-
डॉ. एलएच हिरानंदानी हॉस्पिटल येथील मुख्य आहारतज्ज्ञ ऋचा आनंद यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना एक महिना चहा सोडण्याचे फायदे सांगितले आहेत.
-
शरीरातील कॅफीनचे प्रमाण नियंत्रणात येऊन तुम्हाला चांगली झोप लागण्यास सुरुवात होऊ शकते.
-
कॅफिनमुळे हार्मोन्स सक्रिय होऊन चिंता सुद्धा वाढ शकते. चहा न घेतल्यास आपण चिंतामुक्त राहू शकता
-
चहामुळे लघवीला जाण्याचे प्रमाणवाढते यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होऊ लागतं.
-
याचाच प्रभाव मग त्वचेवर सुद्धा पिंपलच्या रूपात दिसू लागतो. चहा टाळल्याने हे त्रास सुद्धा कमी होऊ शकतात
-
चहा सोडल्याने शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी होतात, ज्यामुळे पेशींना चालना मिळते. हे पाचन रोग आणि कर्करोगाच्या विशिष्ट प्रकारांना थांबवण्यास मदत करू शकते.
-
काही लोकांसाठी चहाचे सेवन हा सवयीचा भाग झालेला असतो. यामुळे एका प्रकारची तरतरी व ऊर्जा येते असेही अनेकजण म्हणतात
-
चहा बंद केल्याने ही ऊर्जा कमी झाल्याचा मानसिक आभास होऊ शकतो.
-
तुम्ही फायदे व तोटे दोन्ही लक्षात घेऊन चहासाठी उत्तम पर्याय शोधू शकता. ग्रीन टी आवडत नसल्यास, पेपरमिंट टी, अपराजितांच्या फुलांचा ब्लु टी असे पर्याय उत्तम काम करतात.
30 Days No Tea: एक महिना चहा न प्यायल्यास होणारे फायदे व तोटे, दोन्ही वाचा व मगच निर्णय घ्या
Skip Tea For A Month: आपल्यापैकी अनेकांना चहा म्हणजे जीव की प्राण असतो. पण समजा प्रयोग म्हणून आपण एक महिना चहा बंद करण्याचे ठरवले तर त्याचे नेमके काय व कसे परिणाम होऊ शकतात हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया ..
Web Title: 30 days no tea can make these body changes does skipping tea helps to loose weight faster reduce acidity and gas svs