-
लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना महाप्रसाद प्रचंड आवडतो. अनेकजण आवडीने महाप्रसादातील मसालेभात खातात. (Photo : Social Media)
-
अनेकदा प्रयत्न करुनही महाप्रसादासारखा टेस्टी मसालेभात घरी बनवता येत नाही पण तुम्हाला असा मसालेभात घरी बनवायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला खास पद्धत सांगणार आहोत. (Photo : Social Media)
-
चला तर जाणून घेऊ या घरच्या घरी महाप्रसादासारखा टेस्टी मसाले भात कसा बनवायचा? (Photo : Social Media)
-
साहित्य : तांदूळ, बटाटा, कोबी, मटर, जिरे, आलं, कडीपत्ता, हिंग, हिरवी मिरची, टोमॅटो, हळद, तेल, मोहरी, कांदा, शेंगदाणे, लाल तिखट, पाणी, मीठ, गरम मसाला, धनेपूड (Photo : Social Media)
-
सुरुवातीला तांदूळ दोनदा धूवून एका भांड्यामध्ये पाण्यात भिजून ठेवा. त्यानंतर कमी आचेवर गॅसवर कुकर ठेवा. त्यात थोडं तेल टाका. (Photo : Social Media)
-
तेल गरम झाल्यावर त्यात सुरुवातीला जीरे मोहरी कडीपत्ता हिंग, आलं पेस्ट,हिरवी मिरची, कांदा टाका आणि चांगले परतून घ्या. (Photo : Social Media)
-
त्यानंतर त्यात धने पुड, गरम मसाला, हळद, लाल तिखट, मीठ टाकून चांगल्याने परतून घ्या. त्यानंतर टोमॅटो टाका. थोडा वेळ झाल्यानंतर त्यात बटाटा आणि बारीक चिरलेली कोबी टाका. (Photo : Social Media)
-
थोड्या वेळाने पाण्यात भिजवलेले तांदूळ त्यात मिक्स करा. तांदूळ मिक्स झाल्यानंतर त्यात गरजेनुसार पाणी टाका. (Photo : Social Media)
-
कुकरचे झाकण लावा आणि मंद आचेवर कुकरच्या दोन शिट्ट्या होऊ द्या. तुम्ही मसालेभाताबरोबर कढी करू शकता. (Photo : Social Media)
Masale Bhaat Recipe : महाप्रसादासारखा टेस्टी मसालेभात कसा बनवायचा?
Masale Bhaat Recipe : अनेकदा प्रयत्न करुनही महाप्रसादासारखा टेस्टी मसालेभात घरी बनवता येत नाही पण तुम्हाला असा मसालेभात घरी बनवायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला खास पद्धत सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊ या घरच्या घरी महाप्रसादासारखा टेस्टी मसाले भात कसा बनवायचा?
Web Title: Masale bhaat recipe how to make masale bhaat like mahaprasad ndj