-
आपली जीवनशैली बदलणे, बैठे जीवन, खाण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे वजन वाढते.
-
वजन कमी करण्यात योग आणि प्राणायाम देखील महत्त्वाची भूमिका बजावतात, नियमित योग केल्यास वजन कमी करता येते.
-
योग हा एक सर्वांगीण सराव आहे, ज्यामुळे इतर शारीरिक क्रियाकलापांप्रमाणेच, मानवी शरीराला बाहेरून तसेच आतून शुद्ध आणि पुनरुज्जीवित करता येतं.
-
जर एखाद्याने दैनंदिन दिनचर्येचा भाग म्हणून योगाभ्यास केला तर, व्यक्तीला खरोखरच मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या फरक जाणवू शकतो.
-
तसेच, बोनस म्हणून योगामुळे वजन कमी होण्यास मदत होते. ही पाच योगासने करून पहा जे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करू शकतात.
-
सूर्यनमस्कार: हा मूलभूत योगासनांपैकी एक आहे आणि आसनांच्या व्यापक अभ्यासापैकी एक आहे. सूर्यनमस्कारात १२ मुद्रा असतात ज्या एका चक्रात केल्या जातात. हे शरीराच्या सर्व भागांना कव्हर करते आणि शरीर सक्रिय ठेवते.
-
ब्रिज पोझ: ही बोट पोझची उलटी पोझ आहे.हात जमिनीला लागून ठेवायचे. आणि शरीर वरच्या दिशेने खेचायचं. यासाठी तुम्हाला गुडघे दुमडून वरच्या दिशेले उचलावे लागतात. वाढलेले पोट, मांड्या आणि पाठीसाठी हा योगप्रकार चांगला आहे.
-
बोट पोझ : पाठीवर झोपून नंतर V-आकाराच्या स्थितीत या. आणि ३० सेकंद ते एक मिनिट अशाच स्थितीत राहा. हा योगप्रकार करत असताना खोलवर श्वास घ्या. यामुळेही वजन कमी होण्यास मदत होईल.
-
कपालभाटी : हा प्रामुख्याने श्वासोच्छवासाचा व्यायाम आहे, ज्यामध्ये तुम्हाला वारंवार दीर्घ श्वास घेणे आवश्यक आहे. दिवसातून किमान २५ ते ३० वेळा असे केल्याने पोटाची चरबी कमी होते आणि एकूण वजन कमी होण्यास मदत होते.
झटपट वजन कमी करण्यासाठी ‘हे’ योगप्रकार नियमित करा!
योग केवळ वजन कमी करण्यास मदत करतो असे नाही तर तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा एक भाग म्हणून योगाभ्यास केल्यास तुम्हाला खरोखरच मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या फरक जाणवू शकतो.
Web Title: Weight loss yoga pranayama health tips gujarati news sc ieghd import sgk