• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. weight loss how sprouts help to lose weight do you want to weight loss eat sprouts healthy lifestyle ndj

Weight Loss : वजन कमी करायचे आहे? मोड आलेली कडधान्ये खा…

१०० ग्रॅम मोड आलेल्या मिश्र कडधान्यांमध्ये जवळपास ३२ कॅलरीज असतात; पण यामध्ये फायबरची मात्रा भरपूर असते. त्यामुळे वजन कमी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. याविषयी अपोलो हॉस्पिटलच्या पोषणतज्ज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सविस्तर माहिती दिली.

October 12, 2023 14:38 IST
Follow Us
  • how sprouts help to lose weight
    1/9

    प्रत्येकाला आरोग्यदायी जीवन जगावेसे वाटते. अनेक जण व्हिटॅमिन्सचा मुबलक स्रोत मिळावा यासाठी मल्टीव्हिटॅमिन घेतात; पण जर मोड आलेले कडधान्य तुम्ही दररोज खाल्ले, तर तुम्हाला मल्टीव्हिटॅमिनची काहीही आवश्यकता भासणार नाही. (Photo : Freepik)

  • 2/9

    मोड आलेल्या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन्स, खनिजे भरपूर प्रमाणात असताच. त्याशिवाय ते पचायलाही तितकेच सोईस्कर असतात. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये कॅलरीची मात्रा खूप कमी असते. (Photo : Freepik)

  • 3/9

    १०० ग्रॅम मोड आलेल्या मिश्र कडधान्यांमध्ये जवळपास ३२ कॅलरीज असतात; पण यामध्ये फायबरची मात्रा भरपूर असते. त्यामुळे वजन कमी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. याविषयी अपोलो हॉस्पिटलच्या पोषणतज्ज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सविस्तर माहिती दिली. (Photo : Freepik)

  • 4/9

    शारीरिक कार्य करताना ज्याप्रमाणे व्हिटॅमिन्स गरज भासते त्याचप्रमाणे खनिजेसुद्धा गरजेची असतात. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह व पोटॅशियम यांसारख्या खनिजांचा चांगला स्रोत असतो. कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात आणि दातांचे आरोग्य चांगले राहते. (Photo : Freepik)

  • 5/9

    मोड आलेल्या कडधान्यांमध्ये एन्झाइमची मात्रा सर्वाधिक असते. या एन्झाइममुळे पचनसंस्थेला अन्नातून पोषक द्रव्ये शोषून घेण्यास मदत होते. पचनाशी संबंधित समस्या असलेल्या व्यक्तींनी आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा आवर्जून समावेश करावा. (Photo : Freepik)

  • 6/9

    मोड आलेल्या कडधान्यांमध्ये फ्लेव्होनॉइड्स व पॉलिफेनॉल्स (flavonoids and polyphenols)सारखी अँटिऑक्सिडंट्स असतात. ही अँटिऑक्सिडंट्स शरीरातील पेशींचे नुकसान करणाऱ्या रॅडिकल्सचा सामना करतात. या कडधान्यांच्या सेवनाने हृदयविकार आणि कर्करोगासारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो. (Photo : Freepik)

  • 7/9

    या कडधान्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते; त्यामुळे ती प्रीबायोटिक म्हणून काम करतात. प्रीबायोटिक्स हे असे पदार्थ असतात की, जे तुमच्या आतड्यांसाठी आवश्यक असलेल्या जीवाणूंचे पोषण करतात. त्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते, पचनाशी संबंधित समस्या दूर होतात आणि प्रतिकारशक्तीसुद्धा वाढते. (Photo : Freepik)

  • 8/9

    मोड आलेली कडधान्ये आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु, याचे सेवन करताना काही गोष्टींची काळजी घेणेही गरजेचे आहे. नेहमी ताजी कडधान्ये खरेदी करा आणि वापरण्यापूर्वी ती पाण्याने व्यवस्थित धुऊन घ्या. (Photo : Freepik)

  • 9/9

    ही कडधान्ये अत्यंत पौष्टिक असतात. शरीराला ती भरपूर ऊर्जा पुरवतात; ज्याचा आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायदा होतो. वजन नियंत्रित ठेवण्यापासून ते प्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत हे अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे तुमच्या आहारात याचा समावेश करा. तु्म्हाला फरक दिसून येईल. (Photo : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Weight loss how sprouts help to lose weight do you want to weight loss eat sprouts healthy lifestyle ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.