• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. weight gain can happen due to eating cashews healthy lifestyle ndj

काजू खाल्ल्यामुळे खरंच वजन वाढते का?

काजू हा अत्यंत पौष्टिक असून, त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. काजूचे सेवन केल्याने आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे हैदराबाद येथील केअर हॉस्पिटल नामपल्लीच्या डाएटिशियन सनोबर सिद्राह यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना काजूचे आरोग्यदायी फायदे आणि काजू खाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत, याविषयी सविस्तर माहिती दिली. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.

October 17, 2023 18:11 IST
Follow Us
  • weight gain
    1/9

    लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना काजू खायला आवडते. काजू चवीला स्वादिष्ट असतात. याच कारणामुळे इतर ड्रायफ्रुट्सपेक्षा काजू अधिक लोकप्रिय आहेत. काजू हे अनेक पदार्थांमध्ये दिसून येतात. गोड पदार्थांत आवर्जून काजूचा समावेश केला जातो. एवढेच काय तर एखादा पदार्थ आकर्षक दिसावा यासाठीसुद्धा काजूचा वापर केला जातो. (Photo : Pexels)

  • 2/9

    काजू हा अत्यंत पौष्टिक असून, त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. काजूचे सेवन केल्याने आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीराला मिळतात; जे मेंदूच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. त्याशिवाय रोग प्रतिकारशक्ती वाढवणे, हाडे व स्नायू मजबूत करणे आणि अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास काजू मदत करतात. (Photo : Pexels)

  • 3/9

    हैदराबाद येथील केअर हॉस्पिटल नामपल्लीच्या डाएटिशियन सनोबर सिद्राह यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना काजूचे आरोग्यदायी फायदे आणि काजू खाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत, याविषयी सविस्तर माहिती दिली. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. (Photo : Pexels)

  • 4/9

    काजूमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड व पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. त्यामुळे शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोकासुद्धा कमी होतो. (Photo : Pexels)

  • 5/9

    काजूमध्ये कॅलरीचे प्रमाण जास्त असते तरीसुद्धा ते वजन नियंत्रण ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. यात असलेल्या प्रोटिन्स आणि फायबरमुळे फार भूक लागत नाही. (Photo : Pexels)

  • 6/9

    काजूमध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस, तांबे यांसारखे अनेक पोषक घटक असतात; जे हाडे आणि स्नायू यांच्या चांगल्या आरोग्यासाठी तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. (Photo : Pexels)

  • 7/9

    काजूमध्ये व्हिटॅमिन ई व के यांसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात. ते शरीराला तणावमुक्त ठेवण्यास मदत करतात आणि आजारांपासून दूर ठेवतात. (Photo : Pexels)

  • 8/9

    काजू हा ट्रिप्टोफॅनचा (Tryptophan) प्रमुख स्रोत आहे; जो सेरोटोनिन आणि मेलाटोनिन बनवण्यास मदत करतो. त्यामुळे चांगली झोप येते आणि व्यक्तीचा मूडसुद्धा चांगला असतो. (Photo : Pexels)

  • 9/9

    काजू इतर ड्रायफ्रूट्सप्रमाणे नाही. त्यात कॅलरीचे प्रमाण अधिक असते. प्रमाणाबाहेर काजूचे सेवन केल्यामुळे वजन वाढू शकते; पण संतुलित आहाराचा भाग म्हणून एका ठरावीक प्रमाणात काजूचे सेवन केल्याने वजन वाढत नाही. (Photo : Pexels)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Weight gain can happen due to eating cashews healthy lifestyle ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.