Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. healthy food eating tips cancer to heart disease flax seeds are beneficial for many serious diseases pvp

Photos: कर्करोग ते हृदयविकार; अनेक गंभीर आजारांवर अळशीच्या बिया लाभदायक

अळशीचे नियमित सेवन आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते.

December 9, 2023 10:22 IST
Follow Us
  • flax-seeds-health-benefits
    1/12

    अळशीच्या बिया अतिशय औषधी आहेत. अळशीच्या बियांमध्ये मुबलक प्रमाणात पोषक तत्वे आढळतात. यामध्ये प्रथिने, फायबर आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते.

  • 2/12

    याशिवाय फ्लॅक्ससीडमध्ये कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, फोलेट असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत.

  • 3/12

    अळशीच्या बिया केवळ लठ्ठपणावर नियंत्रण ठेवत नाहीत तर ते अनेक आजार बरे करतात. ओमेगा ३ फॅटी अॅसिड असल्याने त्याचे नियमित सेवन हृदयरोग्यांसाठी खूप उपयुक्त आहे.

  • 4/12

    हेल्थलाइनच्या बातमीनुसार, अळशीच्या बिया ओमेगा ३ फॅटी अॅसिडचा उत्तम स्रोत आहेत. यामध्ये अल्फा-लिनोलेनिक अॅसिड (एएलए) देखील आढळते.

  • 5/12

    कोणत्याही एका अन्नातून एकाच वेळी दोन प्रकारचे फॅटी अॅसिड मिळणे कठीण आहे. पण हे दोन्ही जवसाच्या बियांमध्ये असतात. हे कोलेस्टेरॉल कमी करते आणि रक्तवाहिन्यांना सूज येऊ देत नाही.

  • 6/12

    संशोधनात असेही सिद्ध झाले आहे की अळशीच्या बियांमध्ये कर्करोगाच्या पेशी मारण्याची क्षमता असते. यामध्ये लिग्नेन आढळते. लिग्नेन हे वनस्पतींचे संयुग आहे. यामध्ये कर्करोगाशी लढण्याची क्षमता आहे.

  • 7/12

    तसेच यामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि इस्ट्रोजेनिक गुणधर्म आहेत. यामुळे कर्करोगाचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो.

  • 8/12

    अळशीच्या बियांमध्ये इतर पदार्थांपेक्षा जास्त लिग्नेन असते. कॅनडामधील एका अभ्यासात असे आढळून आले आहे की अळशीच्या बिया खाल्ल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका १८ टक्क्यांनी कमी होतो.

  • 9/12

    अळशीमधील फायबर पचन सुधारते, बद्धकोष्टता कमी करते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते.

  • 10/12

    इतकंच नाही तर यातील औषधी गुणधर्म संधिवातापासून आराम मिळवण्यासाठी गुणकारी ठरू शकतात.

  • 11/12

    तसेच, अळशीच्या बिया रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास लाभदायक आहेत.

  • 12/12

    येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (Photos : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Healthy food eating tips cancer to heart disease flax seeds are beneficial for many serious diseases pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.