-
Hair Care: केसांच्या समस्यांमुळे प्रत्येकजण त्रस्त आहे. केस गळणे आणि सतत पातळ होण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी अनेक प्रकारच्या तेलांचा वापर केला जातो. पण, तुम्ही कधी डोक्याला तूप लावण्याचा प्रयत्न केला आहे का? (फोटो सौजन्य – अनप्लॅश)
-
खरं तर केसांना तूप लावणे हा एक आयुर्वेदिक उपाय आहे जो केसांची वाढ होण्यासाठी आणि दाट होण्यासाठी प्रभावी आहे. तूप हे अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आणि अँटी-ऑक्सिडंट्सचाही चांगला स्रोत आहे ज्यामुळे केसांच्या अनेक समस्या दूर होतात. (फोटो सौजन्य – अनप्लॅश)
-
केस वाढतात
केसांना तूप लावल्याने टाळूतील रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे केस लांब, दाट आणि निरोगी होतात. हे केसांच्या वाढीस देखील मदत करते आणि केस गळतीची समस्या कमी करण्यासाठी देखील हा उपाय उपयुक्त आहे. (फोटो सौजन्य – फ्रिपीक) -
केसांना तूप लावण्यासाठी ते कोमट करा आणि बोटांनी किंवा कापसाच्या मदतीने केसांच्या मुळापासून टोकापर्यंत तूप लावा. हे रात्रभर डोक्यावर ठेवता येते किंवा डोके धुण्याच्या एक तास आधी केसांना तूप लावू शकता. (फोटो सौजन्य – अनप्लॅश)
-
कोंडा होईल गायब
कोंडा घालवण्यासाठी तूप अत्यंत गुणकारी आहे. एका भांड्यात २ चमचे तूप, एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा बदाम तेल एकत्र करा. हे मिश्रण टाळूवर नीट लावा आणि तासाभरानंतर डोके धुवा. कोंडा दूर होईल. (फोटो सौजन्य – फ्रिपीक) -
केस मऊ होतील
जरी केसांना साधे तूप लावल्याने केस मऊ होतात, पण खोबरेल तेलात मिसळून लावल्याने केस अत्यंत मऊ होतात. एक चमचा खोबरेल तेलात समान प्रमाणात तूप मिसळा. डोक्याला लावा आणि एक ते दीड तासानंतर डोके शॅम्पूने रोजच्याप्रमाणे धुवा. (फोटो सौजन्य – फ्रिपीक) -
जर तुम्ही हा उपाय आठवड्यातून एकदा वापरलात तर तुम्हाला तुमच्या केसांवर आश्चर्यकारक परिणाम झालेला दिसून येईल. (फोटो सौजन्य – अनप्लॅश)
-
टाळूला ओलावा मिळतो
ज्यांचे केस जास्त कोरडे आहेत त्यांच्यासाठी तूप आश्चर्यकारक आहे. डोक्याला तुपाने मालीश केल्याने कोरड्या, खाज सुटलेल्या टाळूला ओलावा मिळतो. यामुळे केसांमधील कोरडेपणा दूर होतो आणि केस मऊ, रेशमी आणि चमकदार होतात. (फोटो सौजन्य – अनप्लॅश)
तेलाऐवजी केसांना लावा तूप; केस होतील लांब, दाट आणि मऊ, जाणून घ्या फायदे
Benefits Of Ghee For Hair: तेल ऐवजी केसांना लावा तूप, मिळतील भरपूर फायदे
Web Title: Is ghee beneficial or hair how to apply ghee on hair know hair care tips snk