-
आता कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अनेक पटींनी वाढली आहे. चुकीची जीवनशैली, आहार, तणाव अयोग्य सवयी यामुळे याचे प्रमाण वाढू लागले आहे.
-
तथापि बरेचदा अनुवांशिक कारणांमुळेही हृदयविकाराचा धोका असू शकतो. मात्र या आजाराच्यावेळी करावयाचा प्राथमिक उपचार माहित असल्यास आपण याचा धोका बऱ्याच अंशी कमी करू शकतो.
-
आज आपण अशाच काही सोप्या टिप्स जाणून घेणार आहोत. पण त्या आधी आपण हृदय विकाराची लक्षणे जाणून घेऊया.
-
अनेक आरोग्य तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की हृदयविकाराचा झटका आल्यानंतर यातून बरे होण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल हे तुम्ही हृदयविकाराची लक्षणे किती लवकर समजता यावर अवलंबून आहे.
-
तथापि, महिला आणि पुरुष, तसेच आधीपासूनच मधुमेहासारखा आजार असणाऱ्यांमध्ये हृदयविकाराची लक्षणे भिन्न असली तरीही छातीत कळ येणे, छाती जड भासणे, अपचन, मळमळ, थकवा जाणवणे, श्वसनाचा त्रास तसेच अस्वस्थ वाटणे ही हृदयविकाराची सामान्य लक्षणे असू शकतात.
-
हृदयविकाराच्या झटक्याची तीव्रता कमी करण्यासाठी आपण पुढील प्राथमिक उपचार करू शकतो.
-
तज्ज्ञ म्हणतात, जर तुम्हाला हृदयविकाराची लक्षणे दिसत असतील तर तुम्ही तात्काळ रुग्णवाहिका बोलावून घ्यावी.
-
बरेचसे रुग्ण हृदयविकाराच्या झटक्याच्या प्राथमिक लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. अशा परिस्थितीत ते रुग्णालयात दाखल होईपर्यंत त्यांच्या हृदयातील काही मांसपेशी मरण पावलेल्या असतात.
-
मेयो क्लिनिक हेल्थ सिस्टीमचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. जोएल बीचे शिफारस करतात की जर तुम्हाला हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे दिसली तर रुग्णवाहिका बोलवल्यानंतर अॅस्पिरिनचा पूर्ण ३२५ मिलीग्रामचा डोस घ्यावा.
-
जर तुमच्याकडे बेबी अॅस्पिरिन असेल, तर त्याच्या ८१ मिलीग्रामच्या डोसचे चार भाग घ्या. अॅस्पिरिन घेतल्याने तुमच्या धमन्यांमधील रक्ताच्या गुठळ्या तुटण्यास मदत होऊ शकते. यामुळे हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान रक्तवाहिन्यांमधील रक्त प्रवाह रोखला जात नाही.
-
जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला हृदयविकाराचा झटका आला आहे, तर एकट्याने दवाखान्यात जाऊ नका.
-
तुम्हाला हृदयविकाराचा झटका आल्यास ताबडतोब रुग्णवाहिकेला कॉल करा. यामुळे वाटेत परिस्थिती आणखीनच बिघडल्यास तुम्हाला अधिक चांगली मदत मिळू शकते.
-
जर हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीला श्वास घेता येत नसेल किंवा तुम्हाला नाडी सापडत नसेल, तर रुग्णाचे रक्त वाहते राहण्यासाठी त्याला सीपीआर देण्यास सुरुवात करा.
-
मात्र, सर्वप्रथम आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी कॉल करा. सीपीआरसाठी तुम्हाला रुग्णाच्या छातीच्या मध्यभागी जोरदार आणि जलद दाब द्यायचा आहे. एका मिनिटाला सुमारे १०० ते १२० कॉम्प्रेशन्स – पॅरामेडिक्स येईपर्यंत हा दाब द्यायचा आहे.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. (Photos: Freepik)
Heart Attack आल्यास काय करावं माहीत नाही? तज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ मोलाच्या टिप्स करतील मदत
बरेचदा अनुवांशिक कारणांमुळेही हृदयविकाराचा धोका असू शकतो. मात्र या आजाराच्यावेळी करावयाचा प्राथमिक उपचार माहित असल्यास आपण याचा धोका बऱ्याच अंशी कमी करू शकतो.
Web Title: Dont know what to do if you have a heart attack these valuable tips from experts will help pvp