-
साधारणपणे अंडरआर्म्सचा रंग आपल्या बाकीच्या त्वचेच्या रंगाशी जुळतो. पण कधी कधी आपल्या अंडरआर्म्सची त्वचा काळी पडू लगाते. (फोटो : Freepik)
-
गडद अंडरआर्म्स हे कोणत्याही गंभीर आजाराचे संकेत देत नसले तरी त्यांच्यामुळे विशेषत: ज्या महिलांना स्लीव्हलेस कपडे घालणे आवडते त्यांना ते घालायला मिळत नाही. (फोटो : Freepik)
-
बाहेर वावरताना कुणी पाहिलं तर लाज वाटते. वॅक्सिंग, बॉडी स्प्रे, हेअर रिमूव्हल क्रीमचा अति वापर, भरपूर घाम येणे, शरीरातील हार्मोनल बदल इत्यादी कारणांमुळे काखेतील काळेपणा खूपच वाढतो. (फोटो : Freepik)
-
तेव्हा अशा अंडरआर्म्सना स्वच्छ करून त्यांचा काळेपणा घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (फोटो : Freepik)
-
एलोवेरा म्हणजेच कोरफड आपली त्वचा स्वच्छ करण्यास मदत करते. कोरफडीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असल्याने ते त्वचेतील जळजळ आणि डेड सेल्स काढून टाकतात.(फोटो : Freepik)
-
बेसनाच्या पीठामुळे अंडरआर्म्सचा काळेपणा दूर होतो. यासाठी बेसन, दही आणि लिंबाचा रस एकत्र करून पेस्ट तयार करा आणि अंडरआर्म्सच्या त्वचेवर लावा. (फोटो : Freepik)
-
अंघोळ करण्यापूर्वी अंडरआर्म्सवर लिंबाची साल चोळावी. अंघोळीनंतर मॉयश्चरायझर लावावे. (फोटो : Freepik)
-
बटाट्याचा रस हा अंडरआर्म्सचा काळेपणा दूर करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. एका बटाट्याचा किस करून त्याचा रस काढून घ्या. (फोटो : Freepik)
-
अंडरआर्म्सचा काळेपणा दूर करण्यासाठी त्याजागी तुम्ही तांदळाच्या पीठाने हाताने व्यवस्थित स्क्रब करू शकता. (फोटो : Freepik)
काळ्याकुट्ट काळवंडलेल्या अंडरआर्म्सची तुम्हालाही लाज वाटते? ‘हे’ घरगुती उपाय करून पहा, आठवडाभरात मिळेल रिझल्ट
Dark Underarms: काळवंडलेल्या अंडरआर्म्समुळे हैराण आहात? ‘हे’ घरगुती उपाय करून पहा, आठवडाभरात मिळेल रिझल्ट
Web Title: Home remedies to lighten dark underarms srk