-
उच्च रक्तदाबामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी चांगली जीवनशैली आवश्यक आहे.या टीप्स फॉलो करुन तुम्ही औषधांशिवाय उच्च रक्तदाब नियंत्रित करू शकतात.
-
निरोगी अन्न
उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी सकस आहार आवश्यक आहे. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि शेंगा यांचा समावेश करू शकता. -
पोटॅशियम समृध्द आहार
उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी पोटॅशिअमयुक्त पदार्थ घ्यावेत. यासाठी केळी, पालक, वाटाणा यांसारखी फळे आणि भाज्यांचे सेवन करावे. -
मीठ
उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी अति मीठाचे सेवन टाळावे. जास्त मीठ उच्च रक्तदाब होऊ शकते. -
वजन व्यवस्थापन
जास्त वजनामुळेही उच्च रक्तदाब होऊ शकतो. अशा स्थितीत वजन नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. -
व्यायाम करा
व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त राहते आणि अनेक आजारांपासूनही बचाव होतो. -
उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी, नियमित व्यायामाचा सल्ला दिला जातो.
-
धूम्रपान
धूम्रपानामध्ये जास्त प्रमाणात निकोटीन असते ज्यामुळे रक्तदाब वाढतो. अशा स्थितीत रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी धूम्रपान बंद केले पाहिजे. -
तणाव
तणावामुळे, शरीर अस्वस्थ होते आणि हृदयाच्या कार्यावर परिणाम होतो, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. अशा परिस्थितीत तणाव टाळला पाहिजे.
Photo : औषधांशिवाय उच्च रक्तदाब नियंत्रित करायचा आहे? तर ‘या’ टिप्स फॉलो करा
उच्च रक्तदाबामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी चांगली जीवनशैली आवश्यक आहे.
Web Title: High blood pressure home remedies health tips dpj