-
थंड वातावरणात निरोगी राहण्यासाठी, मजबूत प्रतिकारशक्तीसह शरीर आतून उबदार असणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे सध्या लोकांनी न्याहारीमध्ये अंड्यांना प्राधान्य देण्यास सुरवात केली आहे. (फोटो : Freepik)
-
अंड्यामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे, खनिजे आणि पोषक तत्वे असतात, त्यामुळे याला सुपरफूड असेही म्हणतात. अंड्याचे सेवन हिवाळ्यात तुमच्यासाठी औषधाचे काम करू शकते. (फोटो : Freepik)
-
तुम्हीही जर उकडलेली अंडी दररोज खात असाल तर, अंड उकडल्यानंतर किती वेळात खाल्लं पाहिजे हे जाणून घेणे महत्वाचे आहे. (फोटो : Freepik)
-
अंड हे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. यात अनेक पोषकतत्त्वे असतात. त्याचबरोबर शरीराला उर्जाही मिळते. (फोटो : Freepik)
-
अंड्यांमध्ये प्रथिने, लोह, व्हिटॅमिन A, B6, B12, फोलेट, एमिनो अॅसिड, फॉस्फरस आणि सेलेनियम आणि आवश्यक प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. (फोटो : Freepik)
-
अंडी जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवली जातात. आता प्रश्न असा येतो की उकडलेले अंडे किती वेळात खाल्लं पाहिजे? (फोटो : Freepik)
-
जास्त उकडलेली अंडी तुम्ही ५ ते ७ दिवसांपर्यंत ठेऊ शकता आणि जर तुम्ही अंडी कमी उकडलीत, तर त्याला २ दिवसांच्या आत खावे लागेल. (फोटो : Freepik)
-
जर अंड उकडताना त्याचे कवच तुटले तर अशी अंडी २ ते ३ दिवसांच्या आत खावी. (फोटो : Freepik)
-
बाहेर ठेवलेली अंडी २ तास किंवा त्याहून अधिक काळ ठेवू नका. जेव्हा अंडी खायची असतील तर त्याला खाण्यापूर्वी फ्रिजमधून बाहेर काढा. जर अंडी २ तासांपेक्षा जास्त काळ बाहेर ठेवलेली असतील तर आपण ती खाऊ नये. (फोटो : Freepik)
अंडे उकडल्यानंतर किती वेळात खावे? जाणून घ्या…नाहीतर होईल जबरदस्त नुकसान!
अंडे उकडल्यानंतर किती वेळात खावे ? जाणून घ्या नाहीतर…
Web Title: How long you can keep boiled egg know how many hours after boiling eggs should be eaten srk