-
लहान मुलींपासून ते महिलांपर्यंत प्रत्येकाला लांब केस ठेवायला आवडतात. पण, हा छंद जोपासणे तितके सोपे नाही आहे. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
यादरम्यान केस गळणे, केसात कोंडा होणे, केसांना फाटे फुटणे (Split Ends) आदी अनेक समस्या असतात. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
स्प्लिट एंड्समुळे केसांच्या टोकाला दोन फाटे फुटलेले दिसतात. तर या समस्येपासून कशी सुटका करून घ्यायची हे आज आपण जाणून घेऊ. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
केस हलक्या हाताने धुवा : केस तुटणे, केस कोरडे होणे आणि फाटे फुटणे या समस्या टाळण्यासाठी आपले केस हळूवारपणे धुणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य:@Freepik)
-
गरम पाण्याने केस धुणे टाळा : गरम पाण्याचे केस धुतल्याने कमकुवत आणि अधिक कोरडे होतात आणि थेट परिणाम केसांच्या टोकांवर दिसून येतो आणि स्प्लिट एंड्स होण्याची शक्यता उद्भवते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
केसांना तेल लावा : बदाम आणि नारळाचे पौष्टिक तेल फाटे फुटलेल्या केसांना लावा. हे तेल तुमचे केस हायड्रेट करू शकतात आणि केस गळणे सुद्धा टाळू शकतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
स्टाइलिंग साधने वापरणे टाळणे : स्ट्रेटनर आणि ब्लो ड्रायर सारख्या स्टाइलिंग टूल्सच्या उष्णतेच्या सतत संपर्कात राहिल्याने केस ठिसूळ होऊ शकतात आणि केसांना फाटे फुटू शकतात. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
तुमचे केस नियमित विंचरा: जर तुम्ही वेणी बांधत असाल किंवा तुमचे केस मोकळे ठेवत असाल तर तुमचे केस व्यवस्थित विलग करा. केस विलग केले नाही तर कंगव्यामध्ये केस सर्वात जास्त अडकून राहतात आणि फाटे फुटण्याची शक्यता जास्त असते. (फोटो सौजन्य:@Freepik)
Hair Care Tips: अशाप्रकारे घ्या केसांची काळजी! Split Ends च्या समस्या होतील दूर; पाहा सोप्या टिप्स…
स्प्लिट एंड्सच्या समस्येपासून अशी मिळवा सुटका…
Web Title: Six tips to get rid of split ends maintaining your hair health follow this easy steps asp