-
मीठ हा आपल्या रोजच्या जेवणातील सर्वात मुख्य आणि महत्वाचा पदार्थ आहे. मिठाशिवाय चव येऊ शकत नाही. जेवण अळणी असेल किंवा त्यात मीठ कमी असेल तर असे जेवण आपण खाऊ शकत नाही.(फोटो – युट्युब व्हिडीओ ग्रॅब)
-
मात्र हे मीठ फक्त जेवणात नाही तर वेगवेगळ्या समस्यांवरही फायदेशीर ठरतंय. कंस? चला जाणून घेऊयात. (फोटो – युट्युब व्हिडीओ ग्रॅब)
-
तुम्ही कधी गॅसवर मीठ टाकलं आहे का? हो गॅसवर..याचा काय फायदा होतो याचा जबरदस्त असा किचन जुगाडकिचन जुगाड एका गृहिणीने दाखवला आहे.(फोटो – युट्युब व्हिडीओ ग्रॅब)
-
गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय.(फोटो – युट्युब व्हिडीओ ग्रॅब)
-
दूध, तेल असं काही सांडलं की ही शेगडी फारच चिकट आणि मेंचट होऊन जाते. नियमितपणे ही शेगडी साफ केली तर ठिक नाहीतर त्यावर थर जमा व्हायला लागतात.(फोटो – युट्युब व्हिडीओ ग्रॅब)
-
एका गृहिणीने दाखवलेल्या या ट्रिकमध्ये संपूर्ण स्वयंपाक झाल्यावर गॅसवर मीठ टाका आणि कमाल पाहा.(फोटो – युट्युब व्हिडीओ ग्रॅब)
-
स्वयंपाक करुन झाल्यावर गॅसच्या शेगडीवर पाणी घाला आणि त्यावर सगळीकडे शॅम्पू टाका मीठ टाका. १५ मिनीटे हे तसेच ठेवा, तोपर्यंत इतर कामं करा. (फोटो – युट्युब व्हिडीओ ग्रॅब)
-
१५ मिनीटांनी सुक्या कापडाने साफ करा. मीठामुळे शेगडी एकदम चकाचक दिसेल. (फोटो – युट्युब व्हिडीओ ग्रॅब)
-
आतापर्यंत तुम्ही भांड्याचा साबण आणि लिक्विडने गॅस साफ केला असेल, मात्र एकदा मीठ वापरुन नक्की पाहा. (फोटो – युट्युब व्हिडीओ ग्रॅब)
Kitchen Jugaad: गॅस चालू करण्याआधी त्यावर मीठ नक्की टाका; अशी कमाल होईल डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
तुम्ही कधी गॅसवर मीठ टाकलं आहे का? हो गॅसवर..याचा काय फायदा होतो याचा जबरदस्त असा किचन जुगाडकिचन जुगाड एका गृहिणीने दाखवला आहे.
Web Title: Kitchen tips in marathi salt on gas cleaning tips kitchen jugaad video srk