• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • बिहार निवडणूक
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता प्रीमियम
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • नरेंद्र मोदी
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. what happens to body if we skip potatoes for one month if you avoid batata vada bhaji for 30 days can you loose weight sugar bp svs

महिनाभर बटाटा खाल्लाच नाहीतर शरीरात काय बदल होतील? कॅलरी कमी करण्यासाठी बटाटे कसे खावे हे ही वाचा

What Happens To Body If Stop Eating Potatoes: काही सुचलं नाही की पटकन बटाटा वापरून वेळ व कष्ट सुद्धा वाचवता येतात. पण जास्त बटाटा खाल्ल्याने नुकसानही होऊ शकते, आज आपण एक महिना बटाटा न खाण्याचा प्रयोग तुम्हाला काय फायदे व तोटे देऊ शकतो, हे पाहणार आहोत.

February 23, 2024 20:00 IST
Follow Us
  • What Happens To Body If We Skip Potatoes For One Month If You Avoid Batata Vada Bhaji For 30 Days Can You Loose Weight Sugar BP
    1/9

    बटाट्याच्या काचऱ्या ते बटाटे वडे, पापड, कीस, चकल्या, ठेचा.. जी म्हणाल ती रेसिपी बटाटा वापरून करता येते. पण अति तिथे माती नियमानुसार बटाट्याचे अधिक सेवन धोक्याचे ठरू शकते. आज आपण प्रयोग म्हणून एक महिना बटाटा बंद करण्याचे काही संभाव्य फायदे तोटे पाहणार आहोत

  • 2/9

    प्राची जैन, मुख्य क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आणि एचओडी (न्युट्रिशन आणि डायटेटिक्स), सीके बिर्ला हॉस्पिटल,यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, बटाटा हा ऊर्जा प्रदान करणारा उत्तम स्रोत आहे पण त्या जोडीने तो कॅलरीजचे प्रमाण सुद्धा वाढवतो परिणामी ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी बटाटा घातक ठरू शकतो

  • 3/9

    आहारतज्ज्ञ शिवानी अरोरा यांनीही इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं की, “एका महिन्यासाठी तुमच्या आहारातून बटाटे काढून टाकल्यास रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात ठेवता येते. शिवाय यामुळे कार्बोहायड्रेटचे सेवन कमी होते, ज्यामुळे चयापचय प्रक्रिया सुधारू शकते.

  • 4/9

    डॉ. किरण दलाल, मुख्य आहारतज्ज्ञ, फोर्टिस एस्कॉर्ट्स हॉस्पिटल यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, बटाट्यापासून बनवलेल्या उत्पादनांमध्ये मीठ (सोडियम) जास्त असते. जास्त मीठ हे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढवते. बटाटा टाळल्याने सोडियमचे प्रमाण आटोक्यात राहते.

  • 5/9

    दुसरीकडे, बटाटे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी ६ आणि पोटॅशियम सारखे आवश्यक पोषक प्रदान करतात. बटाटे पूर्णपणे वगळल्यास पोषण मिळण्यात अडचण येऊ शकते.

  • 6/9

    डॉ.दलाल सांगतात की, काही बटाट्यांमध्ये आढळणारा सुरक्षित स्टार्च हा प्रकार एक प्रिबायोटिक म्हणून काम करतो ज्याने आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियाची वाढ होण्यास मदत होते. बटाटे टाळल्यास हे फायदे कमी होतात.

  • 7/9

    काहींनी बटाटे खाताना सावधगिरी बाळगायला हवी. डायबिटीस, किडनी किंवा पचनाच्या समस्या असणाऱ्यांनी, वजन कमी करू इच्छिणाऱ्यांनी बटाट्याचे सेवन टाळणेच उत्तम ठरेल

  • 8/9

    आहारतज्ज्ञ विलासिनी भास्करन सांगतात की, बटाट्यांचे फायदे व तोटे पाहता त्यांना आहारातून पूर्णपणे काढून टाकण्यापेक्ष प्रमाणात सेवन करणे हिताचे ठरेल

  • 9/9

    उकडलेल्या बटाट्यांमध्ये तळलेल्या बटाट्यांपेक्षा कमी कॅलरी असतात. अशा गोष्टी लक्षात घेतल्यास बटाट्याचा आस्वाद घेता येऊ शकतो. (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: What happens to body if we skip potatoes for one month if you avoid batata vada bhaji for 30 days can you loose weight sugar bp svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.