• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. mahashivratri 2024 special shubh yog made after 300 years these zodiac sign big success job and carrier pdb

महाशिवरात्रीपासून ‘या’ राशींचे सुरु होणार अच्छे दिन? ३०० वर्षांनी ‘शुभ योग’ जुळून आल्याने महादेवाच्या कृपेने मिळू शकतो अपार धन

Mahashivratri Shubh Yog 2024: यंदाच्या महाशिवरात्रीला ‘शुभ योग’ जुळून आल्याने काही राशींना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.

Updated: February 26, 2024 18:45 IST
Follow Us
  • महाशिवरात्री हा हिंदूंचा प्रमुख धार्मिक सण आहे. महाशिवरात्री हा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. महाशिवरात्र हा भगवान शंकराच्या विशेष पूजा-विधीसाठी महत्त्वाचा दिवस आहे.
    1/9

    महाशिवरात्री हा हिंदूंचा प्रमुख धार्मिक सण आहे. महाशिवरात्री हा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. महाशिवरात्र हा भगवान शंकराच्या विशेष पूजा-विधीसाठी महत्त्वाचा दिवस आहे.

  • 2/9

    यंदा ८ मार्च २०२४ रोजी महाशिवरात्री साजरी होईल. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी अत्यंत शुभ योग निर्माण होत आहे. असा अद्भूत योग तब्बल ३०० वर्षांनी निर्माण होत असल्याचे ज्योतिषशास्त्रातून समोर आले आहे.

  • 3/9

    हिंदू पंचांगानुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी ४ वाजून ४५ मिनिटापासून संपूर्ण दिवस ‘शिव योग’ राहणार आहे. तर सोबतच सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी ‘सर्वार्थ सिध्दी योग’ सुरु होणार आहे. हा शुभ योग १० वाजून ४५ मिनिटांपर्यंत असेल.

  • 4/9

    ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या बाबतीतही शुभ योग घडून येत आहे. मकर राशीमध्ये मंगळ आणि चंद्राची युती, ज्यामुळे ‘चंद्र मंगल योग’ निर्माण होत आहे तर दुसरीकडे कुंभ राशीमध्ये शुक्र, शनि आणि सूर्याच्या युतीने ‘त्रिग्रही योग’ घडून येत आहे.

  • 5/9

    तर मीन राशीमध्ये राहू आणि बुधाची युती होत आहे. त्यामुळे या शुभ संयोगामुळे महाशिवरात्रीच्या शुभ पर्वापासून काही राशींचे अच्छे दिन सुरु होण्याची शक्यता आहे. कोणत्या राशींवर शंकराची कृपा बरसणार आहे. जाणून घेऊयात…

  • 6/9

    मेष राशींच्या लोकांवर भगवान शंकराची विशेष कृपा राहू शकते. अडकलेली काम चांगल्या पद्धतीने मार्गी लागू शकतात. शंकराच्या कृपेने अडकलेले पैसे या काळात परत मिळू शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना नोकरीच्या संधी मिळू शकतात.

  • 7/9

    मिथुन राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्री खूप शुभ ठरु शकते. या राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात मालमत्ता खरेदीचे शुभ योग जुळून येऊ शकतात. गुंतवणुकीतून मोठा नफा मिळू शकतो. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते.

  • 8/9

    सिंह राशीच्या लोकांवर भगवान शंकराची कृपा राहू शकते. या काळात विशेष लाभ मिळू शकतो. व्यापारामध्ये आणि व्यवहारांमध्ये मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. कुटुंबातील वातावरण उत्साही राहण्याची शक्यता आहे.

  • 9/9

    (टीप-वरील माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे) (फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
ज्योतिषशास्त्रAstrologyज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeराशी चिन्हZodiac Signराशीभविष्यHoroscopeराशीवृत्तRashibhavishya

Web Title: Mahashivratri 2024 special shubh yog made after 300 years these zodiac sign big success job and carrier pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.