• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. diy skin care benefits of potato face packs homemade potato face pack good for skin sjr

बटाट्याच्या फेस पॅकने चेहऱ्यावरील काळे डाग, मुरम, सुरकुत्या होतात गायब? त्वचारोगतज्ज्ञ काय सांगतात वाचा

Benefits of Potato face Pack : बटाट्याच्या फेस पॅकने खरेच चेहऱ्यावरील काळे डाग, मुरमे, सुरकुत्या दूर होतात का? यावर त्वचारोग तज्ज्ञांचे काय मत आहे जाणून घेऊ…

February 29, 2024 16:33 IST
Follow Us
  • diy skin care benefits of potato face packs homemade potato face pack good for skin
    1/10

    चेहऱ्यावरील कोणत्याही समस्या दूर करण्यासाठी अनेक जण झटपट उपाय शोधत असतात. असे बरेचसे उपाय इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्यातील एक उपाय म्हणजे बटाट्याचा फेस पॅक. या फेस पॅकने त्वचेच्या समस्या दूर होतात, असा दावा अनेक सोशल मीडिया पोस्टमध्ये करण्यात आलेला असतो.

  • 2/10

    पण, बटाट्याच्या फेस पॅकने खरेच चेहऱ्यावरील काळे डाग, मुरमे, सुरकुत्या दूर होतात का? याविषयी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना त्वचारोग तज्ज्ञ डॉ. रिंकी कपूर यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

  • 3/10

    सध्या इन्स्टाग्रामवरील ब्युटी ब्लॉगर शालिनी यांनी बटाट्यापासून बनविलेल्या फेस पॅकविषयी माहिती दिली आहे. या बटाट्याच्या फेस पॅकमध्ये मुलतानी माती, लिंबाच्या रसाचे काही थेंब व अॅलोव्हेरा जेल अशा गोष्टींचा वापर करण्यात आला आहे. हा फेस पॅक वापरल्याने चेहऱ्याची चमक वाढते, तसेच मुरमांची समस्या कमी होते, असे त्यांनी सांगितले आहे.

  • 4/10

    यात त्यांनी हा फेस पॅक कशा प्रकारे वापरायचा याविषयी सांगितले आहे. तुम्ही ब्रश किंवा कापसाच्या साह्याने हा पॅक चेहऱ्यावर लावा. त्यानंतर १५ मिनिटे तो तसाच राहू द्या आणि मग धुऊन टाका.

  • 5/10

    बटाट्यापासून तयार केलेला फेस पॅक स्किनकेअर रूटीनमधील लोकप्रिय उपाय आहे. त्यामुळे काळे डाग, मुरमे, सुरकुत्या अशा समस्या कमी होत असल्या तरी व्यक्तिपरत्वे याचा प्रभाव भिन्न असू शकतो.

  • 6/10

    बटाट्यामध्ये जीवनसत्त्व ‘क’चे प्रमाण जास्त असते; ज्यामुळे त्वचा उजळते आणि काळे डाग कमी होण्यास मदत होते. त्याव्यतिरिक्त बटाट्यांमधील नैसर्गिक एन्झाइम्समध्ये सॉफ्ट एक्सफोलिएटिंग गुणधर्म असू शकतात; ज्यामुळे सेल टर्नओव्हरला चालना देणे आणि मुरमांची समस्या दूर होण्यास मदत होते, असे द एस्थेटिक क्लिनिकच्या कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट, कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट व डर्मेटो सर्जन डॉ. रिंकी कपूर यांनी सांगितले आहे.

  • 7/10

    डर्मेटोलॉजिस्ट-ट्रायकोलॉजिस्ट-कॉस्मेटोलॉजिस्ट, लेझर स्पेशलिस्ट आणि स्कुची सुपर क्लिनिक डॉ. मेघना मौर यांनी सांगितले की, बटाटा त्वचा उजळ करणाऱ्या घटकांपैकी एक नैसर्गिक स्रोत आहे. जसे की, पोटॅशियम, जीवनसत्त्व क, कॅटेकोलेस एंझाइम व अझलेइक अॅसिड. पण, बटाट्याच्या फेस पॅकचा तुम्ही नियमितपणे चेहऱ्यावर वापर केल्यास काळे डाग, हायपरपिग्मेंटेशन, फ्रिकल्स व टॅनिंग कमी करू शकतात. त्याव्यतिरिक्त डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यासही मदत होऊ शकते.

  • 8/10

    एक स्वतंत्र, पण पूरक उपाय म्हणून बटाट्याचा फेस पॅक वापरणे फायदेशीर ठरू शकते. काळे डाग आणि मुरमांची समस्या कमी करण्यासाठी बऱ्याचदा बहुआयामी दृष्टिकोन आवश्यक असतो; ज्यामध्ये नियमितपणे स्किनकेअर रुटीन फॉलो करणे आवश्यक आहे. तसेच योग्य स्वच्छता राखून, आवश्यक असल्यास आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या, असेही डॉ. कपूर म्हणाल्या.

  • 9/10

    परंतु, तुम्ही बटाट्याचा फेस पॅक वापरणार असाल, तर आधी तो तुमच्या त्वचेसाठी योग्य आहे का, यामुळे तुमच्या त्वचेला काही त्रास तर होणार नाही ना याची काळजी घ्या. त्याचप्रमाणे कोणतीही संभाव्य अॅलर्जी किंवा कोणत्याही प्रकारच्या अॅलर्जीपासून स्वत:ला आणि इतर कोणालाही वाचवण्यासाठी पॅच टेस्ट करा,

  • 10/10

    तसेच योग्य आणि फायदेशीर स्किनकेअर रुटीनची गरज असेल, तर त्वचारोग तज्ज्ञांशी संपर्क करा. कारण- ते त्वचेशी संबंधित विशिष्ट समस्यांचे निकारण करण्याबरोबरच तुमच्या त्वचेचा प्रकार, इतिहास आणि तुमच्या समस्यांची तीव्रता या आधारे तुम्हाला वैयक्तिक सल्ला देऊ शकतात, असे डॉ. कपूर म्हणाल्या.

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Diy skin care benefits of potato face packs homemade potato face pack good for skin sjr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.