• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. easy beauty tips for dark neck in marathi check out some dos and donts dha

Beauty tips : घरगुती उपाय, मानेवरील काळपटपणा घालवण्यासाठी काय करावे, काय नको; जाणून घ्या…

मान स्वच्छ ठेवण्यासाठी, त्यावरील काळपटपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय आणि टिप्स पाहा.

Updated: March 1, 2024 19:53 IST
Follow Us
  • Easy tips for dark neck
    1/9

    स्किन केअर म्हंटल कि केवळ हात आणि चेहऱ्याचा विचार करतो. मात्र मानेकडे अनेकदा दुर्लक्ष होत असते. परंतु मान काळी पडू नये किंवा मानेवरील काळपटपणा घालवण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत, ते जाणून घ्या. तसेच कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या नको ते पाहा. [Photo credit – Freepik]

  • 2/9

    मानेवर काळपटपणा येऊ नये यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्या?
    तुम्ही गळ्यात एखादी चेन घालत असल्यास, ती चेन रात्री झोपताना गळ्यातून काढून ठेवावी. तसेच खूप कडक कॉलर असणारे शर्ट घालणे टाळावे. अति कडक कॉलरचे शर्ट घातल्यास मानेच्या त्वचेला त्रास होऊ शकतो.[Photo credit – Freepik]

  • 3/9

    अनेकांना अंघोळ करताना मान खसखसून, घासून स्वच्छ करायची सवय असते. मात्र तसे केल्यानेदेखील मानेचा रंग गडद होऊ शकते. मान काळी पडू शकते.[Photo credit – Freepik]

  • 4/9

    मानेचा रंग उजळण्यासाठी काय करावे?
    स्वतःला दररोज व्यायाम करायची सवय लावावी. तसेच, आपला आहार पौष्टिक असून, त्यामध्ये भाज्यांचा अधिक प्रमाणात समावेश असावा.[Photo credit – Freepik]

  • 5/9

    घराबाहेर पडताना, हात आणि चेहऱ्यासह मानेलादेखील न चुकता सनस्क्रीन लावावे. [Photo credit – Freepik]

  • 6/9

    तुमच्या शरीरात व्हिटॅमिन्स म्हणजेच जीवनसत्त्वांची कमतरता आहे का हे तपासून पाहावे. खासकरून, ब 12 [vitamin B १२] आणि ड जीवनसत्त्व शरीरात योग्य प्रमाणात असल्याची खात्री करावी.[Photo credit – Freepik]

  • 7/9

    मानेचा काळपटपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय
    मानेचा काळपटपणा घालवण्यासाठी तुम्ही बटाट्याच्या रसाचा वापर करू शकता. बटाट्याचा रस मानेवर लावल्यास, तिचा काळपटपणा कमी होण्यास मदत होऊ शकते.[Photo credit – Freepik]

  • 8/9

    कुंकुमादी तेलाने मानेवर मसाज केला, तर त्यानेदेखील काळवंडलेली मान उजळण्यास मदत होईल. [Photo credit – Freepik]

  • 9/9

    सर्वात सोपा उपाय म्हणजे डाळीचे पीठ आणि हळद यांपासून बनवलेली पेस्ट. आपण चेहरा उजळण्यासाठी वापरत असलेल्या हळद आणि डाळीचे पीठ या दोन गोष्टींचा वापर करून, त्यांचे एक मिश्रण बनवून घ्यावे. हे मिश्रण मानेला लावून ठेवा. असे केल्यानेदेखील मानेची त्वचा उजळ होण्यास मदत होऊ शकते. [Photo credit – Freepik]

TOPICS
ब्युटीBeautyलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsस्कीन केअर टिप्सSkin Care Tips

Web Title: Easy beauty tips for dark neck in marathi check out some dos and donts dha

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.