-
जुन्या तव्यावर, कडेला जमा झालेला काळा थर तुम्ही अनेकदा पहिला असेल. तो स्वच्छ करण्यासाठी भरपूर प्रयत्नदेखील केले असतील. मात्र तो थर काही केल्या जात नाही. तुमच्याही घरी असा तवा आहे का? त्यावरचे कोटिंग न घालवता तो स्वच्छ कसा करायचा असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? [Photo credit – Freepik]
-
दररोज पोळ्या, चपात्या बनवण्यासाठी, तसेच कधीतरी त्याच तव्यावर डोसा, घावन, थालीपीठ, अंड्याचे ऑमलेट यांसारखे पदार्थ बनवताना तव्यावर तेल, तूप, बटर वैगरे गोष्टी घातल्या जातात. या पदार्थांचे तव्यावर राहिलेले अंश जर नीट घासले गेले नाही तर त्याला वास येतो; तवा तसाच ओशट राहतो. मात्र असा ओशटपणा आणि तव्यावर जमलेला काळा थर अगदी दहा मिनिटांत काढायचा असल्यास पुढील प्रयोग करून पाहा. [Photo credit – Freepik]
-
यासाठी लागणारे साहित्य – व्हिनेगर, खायचा सोडा/इनो, कापड [Photo credit – Freepik]
-
कृती – सर्वप्रथम स्वच्छ करायचा तवा, गॅसवर ठेऊन मध्यम आचेवर तापवून घ्या. आता तवा तापल्यानंतर त्यावर साधारण एक चमचा व्हिनेगर घालून घ्या. [Photo credit – Freepik]
-
तव्यावर व्हिनेगर घातल्यानंतर, त्यामध्ये खायचा सोडा किंवा इनो मिसळून मिश्रण सर्व तव्यावर पसरवून घ्या. आता हे मिश्रण तव्यावर किमान दहा ते पंधरा मिनिटांसाठी तसेच ठेवून द्यावे. [Photo credit – Freepik]
-
तवा थंड झाल्यावर ओल्या कापडाच्या एका तुकड्याने तव्यावरील सर्व मिश्रण पुसून घ्यावे. आता हीच क्रिया पुन्हा, दोन ते तीनवेळा करावी. [Photo credit – Freepik]
-
तुमच्या तव्यावरची सर्व काळ थर निघून जाईल आणि व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तव्यासारखा स्वच्छ होण्यास मदत होईल. [Photo credit – Freepik]
Kitchen hack : कसा काढाल तव्यावरची चिकट काळा थर? पाहा ‘हा’ सोपा घरगुती उपाय…
रोज वापरात असणाऱ्या तव्यावर काळ्या रंगाचा चिकट थर तयार झालेला असतो. तो घालवण्याची अतिशय सोपी अशी ट्रिक पाहा.
Web Title: Kitchen hacks how to clean black layer from cooking nonstick pan check out dha