• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. use one fitkari in 30 days your gulab jaswandi mogara plant will be full with flowers money saving gardening hacks in marathi svs

तुरटीचा एक खडा वापरल्याने कळ्यांनी गच्च भरेल रोप; गुलाब, मोगरा, जास्वदांसाठी सोपा, स्वस्त उपाय

Fitkari For Flower Plants: तुम्ही रोपांसाठी वापरत असलेल्या मातीचा PH स्तर, पाणी व खताच्या वापराची वारंवारता तसेच बुरशी न लागण्यासाठी करायचे उपाय पाहा

March 7, 2024 20:14 IST
Follow Us
  • Use One Fitkari in 30 days Your Gulab Jaswandi Mogara Plant Will Be Full With Flowers Money Saving Gardening Hacks in Marathi
    1/9

    Fitkari For Flower Plants: आपली बाल्कनी फुलांनी बहरून जावी यासाठी कित्येक जण प्रत्येक वीकएंडला मेहनत घेत असतात. पण तुम्ही घेत असलेली मेहनत योग्य दिशेने व पद्धतीने घेतली जात आहे ना हे ही पाहणे आवश्यक आहे

  • 2/9

    अनेकदा आपण फुलझाडं घरी बाल्कनीत लावतो आणि ती वाढतातही मात्र, त्यांना कळ्या काही लागतच नाहीत. आज आपण तुमच्याकडील रोपं कळ्यांनी गच्च भरून जावी यासाठी तुरटीचा सोपा उपाय पाहणार आहोत

  • 3/9

    SP मराठी गार्डनिंग या युट्युब अकाउंटवर फुलझाडांना कळ्या येण्यासाठी तुरटी किती व कशी वापरावी हे सांगितले होते. या उपायाने अनेकांना फायदा झाल्याचे कमेंट मध्ये म्हटलेले आहे. त्यामुळे आपणही एकदा हा प्रकार नेमका काय हे पाहूया..

  • 4/9

    आपण महिन्यातून किमान एकदा हा तुरटीचा उपाय करू शकता. आपल्याला एक चमचाभर तुरटीची पावडर वापरायची आहे

  • 5/9

    पाच लिटर पाण्यात तुरटीची पावडर मिसळून तुम्हाला हे पाणी सर्व रोपांना द्यायचे आहे. यामुळे पीएच पातळी स्थिर होण्यास मदत होईल.

  • 6/9

    याशिवाय तुरटीच्या उग्र गंधामुळे रोपांना बुरशी लागणे किंवा किड्यांनी रोप पोखरले जाणे असेही त्रास कमी होऊ शकतील.

  • 7/9

    तुरटीचा फायदा होण्याचं कारण म्हणजे मातीचे सुद्धा दोन प्रकार असतात, क्षार युक्त माती व आम्ल युक्त माती. जेव्हा यातील कोणताही गुणधर्म कमी जास्त होतो तेव्हा त्याचा प्रभाव रोपाच्या वाढीवर दिसून येऊ लागतो

  • 8/9

    हेच टाळण्यासाठी मातीची ph पातळी योग्य असणे आवश्यक आहे. यासाठी आपल्याला तुरटीची मदत होऊ शकते. मात्र तुरटी वर म्हटल्याप्रमाणे प्रमाणातच वापरावी अन्यथा फायद्यापेक्षा जास्त नुकसान होऊ शकते

  • 9/9

    तुरटीच्या पाण्याचा वापर आपण फुलझाडांवर करून पाहू शकता यामुळे. तुम्हाला ही आयडिया कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा.(सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Use one fitkari in 30 days your gulab jaswandi mogara plant will be full with flowers money saving gardening hacks in marathi svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.