• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. should we eat sabudana during fasts is really eating sabudana khichdi good for health ndj

Eating Sabudana During Fast : उपवासाला साबुदाणा खावा का? जाणून घ्या

बहुतांश लोकांना उपवासाला साबुदाणा खिचडी खायला आवडते. जर तुम्हालाही आवडत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. उपवासाला साबुदाणा खावा का? साबुदाण्यामध्ये कोणते पौष्टिक घटक असतात? याविषयी आहारतज्ज्ञ पल्लवी सावंत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सविस्तर माहिती दिली.

March 8, 2024 11:16 IST
Follow Us
  • Eating Sabudana During Fast
    1/9

    उपवास म्हटलं की, आपण साबुदाणा, वरईसारखे निवडक पदार्थ किंवा फळे खातो. बहुतांश लोकांना उपवासाला साबुदाणा खिचडी खायला आवडते. जर तुम्हालाही आवडत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. उपवासाला साबुदाणा खावा का? साबुदाण्यामध्ये कोणते पौष्टिक घटक असतात? याविषयी आहारतज्ज्ञ पल्लवी सावंत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सविस्तर माहिती दिली. (Photo : Social Media)

  • 2/9

    साबुदाणा कंदमुळापासून बनतो. त्यामुळे पारंपरिक उपवासाच्या पदार्थांमध्ये साबुदाण्याचा समावेश करण्यात आला आहे.आहारतज्ज्ञ पल्लवी सावंत सांगतात, “आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही फक्त साबुदाण्याची खिचडी खात असाल, तर त्याचं प्रमाणदेखील लक्षात घेणं आवश्यक आहे. उपवासाला त्वरित ऊर्जा देणारा पदार्थ म्हणून आपण साबुदाण्याचा एक पर्याय म्हणून वापर करू शकतो.” (Photo : Social Media)

  • 3/9

    साबुदाणा खाल्ल्यामुळे लगेच ऊर्जा मिळते. साबुदाण्यामध्ये कार्ब्सचे प्रमाण चांगले असते आणि त्यात रेजिस्टन्स स्टार्च असतो. हा एक स्टार्चचा प्रकार आहे; जो पचायला हलका आहे. त्यामुळे उपवासाच्या पदार्थांमध्ये साबुदाण्याला अधिक महत्त्व आहे. (Photo : Social Media)

  • 4/9

    साबुदाणा खिचडीच्या रेसिपीमध्ये आपण शेंगदाण्याचे कूट, तूप इत्यादी गोष्टींचा समावेश करतो. त्यामुळे साबुदाण्याची खिचडी ही उत्तम कार्ब्स आणि फॅट्सयुक्त होते, जी तुम्हाला एकदा खाल्ली की, पुरेशी वाटते. (Photo : Social Media)

  • 5/9

    साबुदाण्यामध्ये प्रोटिन्सचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे साबुदाण्याबरोबर दूध किंवा दही खावे.वरई किंवा भगर, राजगिरा, शिंगाड्याच्या पिठाचे थालीपीठ खाऊ शकता. साबुदाण्याचे थालीपीठ करताना, त्यात शिंगाड्याचे पीठ मिसळावे. त्यामुळे तुम्हाला त्यातून प्रोटिन मिळू शकते. (Photo : Social Media)

  • 6/9

    खूप जास्त प्रमाणात न खाणे हेही तितकेच आवश्यक आहे. दिवसभर आपण खात असतो, चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेतो. जसजसे तापमान बदलते तसतसा तुमच्या रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुमच्या पचनसंस्थेला चांगला आराम देणे आणि त्यानंतर खाणे हा उपवास करतानाचा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. (Photo : Social Media)

  • 7/9

    साबुदाणा ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. आतड्यांच्या आरोग्यासाठी यात चांगले कार्ब्स असतात. ज्यांना पचनाशी संबंधित आजार आहे, त्यांच्यासाठी हे चांगले आहे. सगळ्या वयोगटासाठी साबुदाणा उपयुक्त आहे. साबुदाण्यामध्ये कोलेस्ट्रॉल नसल्यामुळे खाण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.जर तुम्ही साबुदाणा एखाद्या पदार्थामध्ये मिसळून खात असाल, तर चांगले आहे; पण साबुदाण्यामध्ये स्टार्च असल्यामुळे लगेच ऊर्जा मिळते. त्यामुळे दिवसभरातील शरीरातील प्रोटिन्सचे स्वरूप बदलत असते. (Photo : Social Media)

  • 8/9

    शरीराला व्यवस्थित प्रोटिन्स मिळावेत यासाठी साबुदाण्याबरोबर एक वाटी दही किंवा दूध घेणे आवश्यक आहे.असे म्हणतात की, साबुदाणा पचायला जड असतो. जेव्हा साबुदाण्यामध्ये साखर किंवा मीठ किंवा जास्तीची प्रक्रिया केली जाते, तेव्हा तो पचायला जड जातो. फ्राइड साबुदाणा खाण्यापेक्षा वाफेवर तळून खाल्लेला साबुदाणा अधिक चांगला असतो. वजन वाढवण्यासाठीसुद्धा साबुदाणा उत्तम पर्याय आहे. (Photo : Social Media)

  • 9/9

    उपवासाला साबुदाणा खावा की नाही, ही तुमची वैयक्तिक निवड असू शकते; पण कोणताही पदार्थ खाताना संतुलित आहार घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. उपवासादरम्यान योग्य पद्धतीने साबुदाणा खाणेही महत्त्वाचे आहे. (Photo : Social Media)

TOPICS
उपवासफास्ट फूडFast FoodफूडFoodलाइफस्टाइलLifestyle

Web Title: Should we eat sabudana during fasts is really eating sabudana khichdi good for health ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.