• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. best seller suv 2024 from tata punch to hyundai check out the list for top 10 cars dha

फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक खरेदी झालेल्या टॉप १० एसयूव्ही: टाटा पंचने पटकावला पहिला नंबर! यादी पाहा…

फेब्रुवारी २०२४ मध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या टॉप १० एसयूव्ही गाड्यांमध्ये टाटा पंचाने पहिला क्रमांक मिळवला आहे. तसेच मारुती, महिंद्रा ह्युंदाईच्या एसयूव्हीने कितवा क्रमांक मिळवला आहे ते पाहा.

March 9, 2024 09:08 IST
Follow Us
  • list of Top 10 SUVs sold in February
    1/11

    महिंद्रा आणि मारुती सुझुकीमध्ये एसयूव्ही सेगमेंटमध्ये एकमेकांसह अतिटतीचा सामना सुरू असताना, टाटा मोटर्सची एसयूव्ही मात्र फेब्रुवारी महिन्याची बेस्ट सेलर ठरली आहे. भारतातील सर्वात लोकप्रिय एसयूव्ही म्हणून नेक्सॉननंतर आता, भारतात विकल्या गेलेल्या टॉप १० एसयूव्हीच्या यादीत पंचने पहिला क्रमांक पटकावला आहे. फेब्रुवारीमध्ये भारतात विकल्या गेलेल्या टॉप १० एसयूव्हीची यादी पाहा. [photo credit-Freepik]

  • 2/11

    टाटा मोटर्स –
    टाटाची सर्वात लहान एसयूव्ही ही जानेवारी आणि फेब्रीवरी या दोन्ही महिन्यात भारतातील सर्वाधिक विकली जाणारी SUV आहे. फेब्रुवारीत, टाटाने जानेवारीमध्ये लॉन्च केलेल्या पंच ईव्हीसह एसयूव्हीची १८,४३८ युनिट्सची विक्री केली. मॉडेलमध्ये आलेल्या इलेक्ट्रिक व्हर्जनमुळे फेब्रुवारी २०२३ पासून विक्रीत ६५% वाढ झाली आहे. [photo credit -Tata]

  • 3/11

    मारुती ब्रेझा
    ब्रेझा ही एसयूव्ही विभागातील सर्वात मजबूत कार आहे. फेब्रुवारीमध्ये ही गाडी दुसऱ्या क्रमांकावर आहे. मारुती सुझुकीने मागच्या महिन्यात, म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात १५,७६५ गाड्यांची विक्री केलेली आहे. या वर्षीच्या ब्रेझाची विक्री वाढत आहे. मारुतीने वर्षाच्या पहिल्या महिन्यात ब्रेझाच्या १५ हजार ३०३ गाड्यांची विक्री केली होती. [photo credit -Maruti]

  • 4/11

    ह्युंदाई क्रेटा
    या गाडीच्या’ फेसलिफ्ट’ मॉडेलमुळे गाडीची लोकप्रियता पुन्हा वाढलेली आहे. ह्युंदाई क्रेटाने फेब्रुवारीमध्ये भारतात विकल्या गेलेल्या टॉप १० एसयूव्हीच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत ह्युंदाईच्या विक्रीत सुमारे ४७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जानेवारीमध्ये, जेव्हा ह्युंदाईने क्रेटा फेसलिफ्ट लाँच केली, तेव्हा एसयूव्हीला १३,२१२ ग्राहक मिळाले. [photo credit -Hyundai]

  • 5/11

    महिंद्रा स्कॉर्पिओ
    Scorpio-N आणि Scorpio क्लासिक एसयूव्हीची मागणी वाढत आहे. कारण- महिंद्राच्या प्रमुख मॉडेलपैकी एक असलेले, स्कॉर्पियो मॉडेल, फेब्रुवारीमध्ये चौथ्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या तुलनेत विक्रीत ११० टक्क्यांहून अधिक वाढीसह, महिंद्राने गेल्या महिन्यात संपूर्ण भारतभर एसयूव्हीच्या १५,०५१ युनिट्स विकलेल्या आहे. फेसलिफ्ट लाँच झाल्यापासून महिंद्राने एकाच महिन्यात एसयूव्हीच्या १५ हजार पेक्षा जास्त युनिट्सची विक्री करण्याची ही पहिलीच वेळ आहे. जानेवारीमध्ये महिंद्राने एसयूव्हीच्या १४,२९३ युनिट्सची विक्री केली होती. [photo credit -Mahindra]

  • 6/11

    टाटा नेक्सॉन
    विक्रीच्या बाबतीत, Nexon SUV कदाचित पाचव्या क्रमांकावर घसरली असेल. तथापि, ती भारतातील सर्वात लोकप्रिय एसयूव्हींपैकी एक आहे. जवळपास एक वर्ष सातत्याने SUV शर्यतीत आघाडी घेतल्यानंतर, अलीकडच्या काही महिन्यांत विक्रीच्या संख्येत थोडीशी घसरण झाली आहे. फेब्रुवारीमध्ये टाटा मोटर्सने एसयूव्हीच्या १४,३९५ युनिट्सची विक्री केली. गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत विक्रीत किरकोळ वाढ झाली असली तरी, या वर्षी जानेवारीमध्ये वितरीत झालेल्या १७,१८२ युनिट्सवरून त्यात घट झाली आहे. [photo credit -Tata]

  • 7/11

    मारुती फ्रॉन्क्स
    Fronx, मारुतीची सर्वात लहान एसयूव्ही आहे. फेब्रुवारीमध्ये विकल्या गेलेल्या टॉप १० मॉडेलच्या यादीत तिचा सहावा क्रमांक आहे. मारुतीने SUV च्या १४,१६८ युनिट्सची विक्री केली आहे. मारुतीने त्याच्या सर्वात लहान SUV ची हायब्रीड आवृत्ती लाँच करण्याचा निर्णय घेतल्यावर Fronx ची विक्री वाढण्याची आशा आहे. याने नुकतीच व्हेलॉसिटी एडिशन नावाच्या फ्रॉन्क्स क्रॉसओवरची विशेष आवृत्ती सादर केली आहे. [photo credit -Maruti]

  • 8/11

    मारुती ग्रँड विटारा
    ग्रँड विटारा, कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमधील ह्युंदाई क्रेटाची सर्वात जबरदस्त प्रतिस्पर्धी आहे. फेब्रुवारीच्या यादीत मात्र ही सातव्या स्थानावर आहे. गेल्या महिन्यात ग्रँड विटाराने ११,००२ युनिट्सची विक्री केली आहे. ग्रँड विटारा एसयूव्हीमध्ये गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत २०टक्क्यांनी वाढ झाली आहे. [photo credit -Maruti]

  • 9/11

    महिंद्रा बोलेरो
    महिंद्राचे सर्वात जुने मॉडेल असलेल्या बोलेरोची गेल्या महिन्यात १०,११३ युनिट्सची विक्री झाली असून, ही गाडी आठव्या स्थानावर आहे. गो-एन्हीव्हेअर कॅरेक्टरसाठी ओळखल्या जाणाऱ्या एसयूव्हीच्या. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये, महिंद्राने मॉडेलच्या ९,७८२ युनिट्सची विक्री केली होती; ज्यामध्ये बोलेरो निओ एसयूव्हीचाही समावेश होता. [photo credit -Mahindra]

  • 10/11

    किआ सोनेट
    कोरियन ऑटो कंपनीच्या सोनेट सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीने फेब्रुवारीमध्ये त्याच्या मुख्य प्रतिस्पर्धी ह्युंदाई व्हेन्यूला मागे टाकले आहे. किया ने गेल्या महिन्यात ९,१०२ एसयूव्ही युनिट्सची विक्री केली आहे. ही मागील वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत सुमारे ७ टक्क्यांनी कमी आहे. किया ने जानेवारीमध्ये एसयूव्हीचे फेसलिफ्ट व्हर्जन लॉन्च केले होते. [photo credit -Kia]

  • 11/11

    ह्युंदाई व्हेन्यू
    व्हेन्यू सब-कॉम्पॅक्ट SUV ने फेब्रुवारीमध्ये ८,९९३ युनिट्सची विक्री करून यादीत सर्वात शेवटचे म्हणजेच, दहावे स्थान मिळवले आहे. हे सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंट लीडर ब्रेझामध्ये काही फरकाने मागे राहिले आहे. [photo credit -Hyundai]

TOPICS
ऑटोAutoऑटो न्यूजAuto NewsऑटोमोबाइलAutomobile

Web Title: Best seller suv 2024 from tata punch to hyundai check out the list for top 10 cars dha

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.