-
आपल्यातील अनेक जण सकाळी उठल्यावर आधी मोबाईल हातात घेतात. तर दिवसभरातील काम आवरून झाल्यावर हातात मोबाईल घेऊन तासन् तास स्क्रोल करताना दिसतात. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
मोबाईल आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असला तरीही या वस्तू वापरण्याचे जसे चांगले फायदे आहेत तसेच त्याचे बरेच दुष्परिणामही आहेत. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
तसेच रात्री झोपण्यापूर्वी फोन वापरल्याने तुमच्या झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे ही सवय वेळीच बंद केली पाहिजे. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
तर ही सवय मोडून काढण्यासाठी तुम्ही पुढील पाच मार्गांचा उपयोग करू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
तुम्ही दिवसभरातील केलेल्या सर्व गोष्टी कागदावर उतरवून काढा. ही सवय तुम्हाला साकारात्मक विचार करण्यास मदत करते. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
ध्यान करा – तुमचे मन शांत करण्याचा ध्यान हा एक उत्तम मार्ग आहे. ही सवय तुम्हाला विश्रांती प्रदान करेल व तुम्हाला रात्री चांगली झोप लागेल. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
पुस्तक वाचा – पुस्तक वाचल्याने झोप चांगली लागते. कारण ही सवय तुमच्या स्नायूंना आराम देते. तसेच तणाव कमी करण्यासही मदत करते.(फोटो सौजन्य: @Freepik )
-
स्वत: ची काळजी घ्या – स्वत:ची काळजी घ्या आणि दिवसाचा चांगला शेवट करा. चेहऱ्यावर फेस मास्क किंवा केसांना तेल लावा आणि मग शांत झोप घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
गरम पाण्याने अंघोळ करा – झोपण्यापूर्वी एक ते दोन तास आधी गरम पाण्याने अंघोळ करा; असे केल्याने तुम्हाला आराम मिळेल, मन शांत राहील आणि चांगली झोपही लागेल. (फोटो सौजन्य: @Freepik )
मोबाईल बघता बघता झोपण्याची आहे सवय ? मग ‘हे’ उपाय करा अन् घ्या सुखाची झोप
झोपण्यापूर्वी फोनचा वापर कमी करण्यासाठीचे काही उपाय पाहू…
Web Title: Simple ways to reduce or how to stop using phone before bed read this five tricks asp