-
उन्हाळात चवीला गोड असणारे, लाल रसरशीत असे कलिंगड खाल्ल्याने, उन्हामुळे आलेला थकवा क्षणात नाहीसा होतो. अतिशय ‘रिफ्रेशिंग’ असे हे कलिंगड खाऊन झाल्यावर आपण त्याच्या साली कचऱ्यामध्ये फेकून देते. मात्र तुम्हाला माहित आहे का, की याच सालीच्या मदतीने तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांना संध्याकाळच्या खाऊसाठी सुंदर असे ‘पॅनकेक’ बनवू शकता.[Photo credit – Freepik]
-
पॅनकेक हा पाश्चिमात्य पदार्थ असून त्यामध्ये मैद्याचा वापर केला जातो. मात्र कलिंगडाच्या सालींचा वापर करून तुम्हाला अतिशय सुंदर आणि पौष्टिक असे ‘केमुन्डा दोड्डक’ हा पदार्थ बनवता येऊ शकतो. हा पदार्थ अगदी पॅनकेकसारखाच असतो, मात्र यात मैदा किंवा साखर यांचा अजिबात वापर केला जात नाही. चला तर मग हा गोड, पौष्टिक आणि मुलांना आवडेल असा पदार्थ कसा बनवायचा ते पाहू.[Photo credit – Freepik]
-
साहित्य – कलिंगडाच्या साली, गूळ,ओले खोबरे, तांदळाचे पीठ, इडली रवा, मध, साजूक तूप [Photo credit – Freepik]
-
सर्वप्रथम, कलिंगडाच्या साली एका बाऊलमध्ये किसून घ्या. किसलेल्या सालींमधे गूळ घालून घ्या. आता गूळ आणि कलिंगडाच्या साली गूळ विरघळेपर्यंत हाताने कालवून घ्या.[Photo credit – Freepik]
-
आता या मिश्रणात तांदळाचे पीठ, ओले खोबरे, इडलीचा रवा, घालून थालीपीठाचे पीठ मळून घेतो त्याप्रमाणे या दोड्डकसाठी मिश्रण कालवून घ्यावे. तुम्हाला जर पीठ कोरडे वाटत असेल तरच यामध्ये थोडेसे पाणी घालून घ्या.[Photo credit – Freepik]
-
आता दोड्डकचे तयार झालेले पीठ १० मिनिटे झाकून ठेवा. यामुळे रवा फुलून येण्यास मदत होईल.[Photo credit – Freepik]
-
गॅसवर एक तवा ठेवून त्याला थोडेसे तेल लावून घ्यावे. आता हाताला थेंबभर तेल लावून तयार दोड्डकचे मिश्रण थालीपीठ थापतो तसे थेट तव्यावर थापून घ्यावे. [Photo credit – Freepik]
-
मध्यम आचेवर या दोड्डकच्या दोन्ही बाजू छान खरपूस सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावे.[Photo credit – Freepik]
-
दोन्ही बाजूंनी दोड्डक छान खमंग झाल्यावर एका बशीमध्ये काढून घ्या. आता या दोड्डकवर साजूक तुपाचा घट्ट गोळा घालून, मध किंवा पातळ गुळासह आस्वाद घ्यावा. ही रेसिपी इन्स्टाग्रामवरील @swantcookai नावाच्या अकाउंटने शेअर केली आहे. [Photo credit – Freepik]
Recipe : लहान मुलांसाठी बनवून पाहा कलिंगड पॅनकेक! पाहा गोड अन् पौष्टिक रेसिपी…
कलिंगडाच्या सालांचा वापर करून नाश्ता किंवा मधल्या वेळेत खाऊ म्हूणन ‘केमुन्डा दोड्डक’ हा भन्नाट पदार्थ एकदा बनवून पाहा.
Web Title: How to make pancakes with watermelon at home follow steps for kamunda doddak dha