-
weight loss: रोजच्या धकाधकीच्या जीवनात आणि अनियमित जीवनशैलीमुळे लोकांचे वजन झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अत्यंत कमी वयामध्ये वेगवेगळे आजारदेखील निर्माण होत आहेत. (फोटो : Freepik)
-
जास्त प्रथिनांनी युक्त असलेले अन्न खाणे वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. शाकाहारी लोक त्यांच्या आहारात उच्च प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करू शकतात. (फोटो : Freepik)
-
असा आहार केवळ प्रथिनेच नव्हे, तर इतर आवश्यक जीवनसत्त्वे व खनिजांनी समृद्ध असतो. सात दिवस उच्च प्रथिनयुक्त आहार घेतल्यास वजन कमी करण्यास मदत होऊ शकते.(फोटो : Freepik)
-
मात्र, ते दीर्घकाळ टिकणारे नाही. वजन कमी करणे हे तुमच्या सवयीपेक्षा कमी कॅलरी खाण्यावर अवलंबून असते. प्रथिनांमुळे वजन कमी होत नाही; पण त्यात जास्त प्रमाणात असलेला आहार तृप्ततेची हमी देतो.(फोटो : Freepik)
-
त्यामुळे तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते आणि परिणामी तुम्ही कमी खाता, तुमची लालसा कमी होते. (फोटो : Freepik)
-
रोज रोज प्रथिनयुक्त अन्न खाणे तसे कठीण आहे. आपल्याला चमचमीत खायची सवय असते. अशा वेळी साधे प्रथिनयुक्त अन्न खाताना कठीण जाते. (फोटो : Freepik)
-
आहारातून जास्त प्रथिने घेतल्यामुळे तुमचे मूत्रपिंड खराब होऊ शकते. रक्तातील अतिरिक्त प्रथिने फिल्टर करण्यासाठी मूत्रपिंड जबाबदार असतात. जर तुम्ही जास्त प्रथिने खाल्ली, तर मूत्रपिंडावर परिणाम होऊ शकतो.(फोटो : Freepik)
-
अतिशय सक्रिय जीवनशैली असलेले लोक बैठी जीवनशैली असलेल्या लोकांपेक्षा जास्त प्रमाणात प्रथिने सहन करू शकतात.(फोटो : Freepik)
-
जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या आहार आणि जीवनशैलीत बदल करणे महत्त्वाचे आहे. तुमच्या कॅलरीजचे प्रमाण कमी करण्यासाठी वैयक्तिक सल्ला घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांशी किंवा नोंदणीकृत आहारतज्ज्ञांशी बोला. (फोटो : Freepik)
वजन कमी करण्यासाठी ‘सात’ दिवसांचा उच्च प्रथिनयुक्त आहार मदत करू शकतो? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
weight loss diet plan: वजन कमी करण्यासाठी उच्च प्रथिनयुक्त आहार मदत करू शकतो?
Web Title: Quick weight loss can a seven day high protein diet help 7 day diet plan for weight loss srk