-
Uddhav Thackrey & Shivsena Kundali: लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असताना व महाराष्ट्र विधानसभा निवडणुका सुद्धा तोंडावर असताना सध्या राजकारणी मंडळींच्या नशिबाचे ग्रह काय सांगतात हे जाणून घेण्यासाठी ‘सामान्य’ जनता सुद्धा उत्सुक आहे. आज आपण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीचा अंदाज घेणार आहोत
-
प्रसिद्ध ज्योतिषतज्ज्ञ उल्हास गुप्ते यांनी उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या जन्म कुंडलीवरून काही कयास बांधले आहेत. ज्यानुसार २०२५ मध्ये ठाकरेंच्या नशिबात काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. तर काही व्यक्तींबाबत त्यांना सतर्क राहावे लागेल. नेमकं ज्योतिषाचं मत काय आहे, पाहूया.
-
ज्योतिषी उल्हास गुप्ते सांगतात की, शिवसेनेचा जन्मच मुळात अमावास्येचा, आजवर मंगळ, राहू, शनी अशा खडतर महादशांमधून प्रवास केल्यावर आता पक्षाच्या कुंडलीत बुधाची महादशा सुरु होत आहे
-
शिवसेना पक्षाला कुंडलीत बुधाच्या महादशेत निश्चितच आपला गमावलेला प्रभाव पुन्हा प्राप्त करता येईल. पक्षाला पुन्हा नव्या जोमाने वाटचाल सुरु करता येईल व साधारण जून २०२४ मध्येच चांगले बदल दिसू येऊ लागतील.
-
दुसरीकडे, उद्धव ठाकरेंच्या कुंडलीत नवमात मंगळ, षष्टात केतू, दशमात बुध व लाभ स्थानात रवी हे ग्रह राजकीय स्थितीसाठी अत्यंत मदतीचे ठरतील. चतुर्थात स्वराशीतील गुरु व दशमातील मिथुन राशीतील बुध २०२४ नंतर खऱ्या अर्थाने गतिमान होऊन शिवसेनेचे वर्चस्व वाढीस लागेल.
-
२०२४ लोकसभेतही उमेदवार यशस्वी होतील. पण यावेळी स्वतःच्या विचाराने पुढे जाणे खूप महत्त्वाचे असेल. अगदी जवळ येणारी माणसे काही वेळा घातक ठरू शकतात त्यामुळे अंतर राखून त्यांच्याकडून कामे करून घ्यावीत.
-
ठाकरेंच्या कुंडलीत कृष्णपक्षातील षष्ठी ते शुक्ल पक्षातील दशमीपर्यंत चंद्रबळ क्षीण आहे, तसेच हा चंद्र सिंहराशीत व्यय स्थानात बसला आहे. त्याबरोबर राहू व प्लुटो युती करत आहेत. एकूण ग्रहांची ही स्थिती मानसिक त्रासात भर घालणारी आहे. पण चतुर्थातील स्वगृहीच्या गुरूचे पाठबळ खूपसा दिलासा देईल. त्यातून परिश्रम, मेहनत यातून यशाचा मार्ग दिसू लागेल
-
२५ जून २०२५ ते १ जून २०२६ या काळात नवे विचार, नवीन प्रेरणा, नवीन दिशा उद्धव ठाकरे यांना सापडेल आणि त्यातून संघटनेला वेगळे बळ नक्कीच प्राप्त होईल.
-
हे ही पाहा-‘दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ’, अजित पवार व शरद पवारांची पत्रिका सांगते.. वाचा ज्योतिषतज्ज्ञ उल्हास गुप्तेंचा कयास (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
“शिवसेनेला बळ येणार पण उद्धव ठाकरेंना ‘ही’ माणसं घातक”, ज्योतिषी उल्हास गुप्ते म्हणतात, “येत्या दोन महिन्यात..”
Shivsena & Uddhav Thackeray Astrology: उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी राज्याची सूत्रे हाती घेतली. मार्च २०२० मध्ये आलेल्या कोविड महासाथीने सरकारची परीक्षाच पाहिली. पद, चिन्ह गेल्यावर आता नव्याने निवडणुकीचं मैदान समोर असताना ठाकरेंची कुंडली काय सांगते, पाहा
Web Title: Uddhav thackrey kundali shows shivsena become powerful in next two months but these people are threat before loksabha elections svs