-
ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठराविक अंतरानंतर ग्रहांचा इतर ग्रहांशी संयोग होतो, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर, देशावर आणि जगावर दिसून येतो.
-
ग्रहांचा अशा संयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. जेव्हा जेव्हा एखादा ग्रह एखाद्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व १२ राशींवर होतो.
-
तर, जेव्हा दोन ग्रह एका राशीत एकत्र येतात तेव्हा त्याला ग्रहांची युती म्हणतात. आता राहू आणि शुक्राची युती होणार आहे.
-
ही युती १८ वर्षांनंतर होणार आहे. शुक्रदेव ३१ मार्चला मीन राशीत प्रवेश करणार आहेत आणि मीन राशीत आधीपासूनच राहू आहेत. त्यामुळे दोन्ही ग्रहांची युती काही राशींसाठी लाभदायी ठरु शकते.
-
शुक्र आणि राहूची युती वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. व्यवसायात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. यासोबतच, जर तुम्ही सट्टेबाजी करण्याचा किंवा शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर या काळात असे करणे फायदेशीर ठरू शकते.
-
शुक्र आणि राहूची युती धनु राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. आपली आर्थिक स्थिती भक्कम होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होऊ शकतात. नोकरीत नवी महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. व्यवसायातून मोठी कमाई होऊ शकते. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात.
-
कुंभ राशीच्या लोकांसाठीही दोन ग्रहांची युती अपार धनलाभ घेऊन येणारी ठरु शकते. परदेशातूनही तुम्हाला चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही एकामागून एक अनेक कामे पूर्ण करण्यात यशस्वी होऊ शकता. नोकरीच्या संधी मिळू शकतात. सहकाऱ्यांकडून कामात चांगलं सहकार्य मिळू शकते.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
-
(फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
५ दिवसांनी ‘या’ राशींचे नशीब पालटणार? १८ वर्षांनंतर २ ग्रहांची महायुती होताच मिळू शकतो बक्कळ पैसा
Shukra And Rahu Yuti: शुक्र राहूची युती होताच काही राशींना मोठा फायदा होऊ शकतो.
Web Title: Venus conjunction rahu in pisces 2024 rahu shukra yuti these zodiac sign get more profit pdb