-
ज्योतिषशास्त्रात शनिदेवाचे विशेष स्थान आहे. शनीचे परिवर्तन किंवा नक्षत्र बदलताना सर्व राशींवर परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रात शनीच्या नक्षत्रात होणारा बदल खूप महत्त्वाचा मानला जातो.
-
न्यायदेवता शनिदेव ७ एप्रिलला रोजी शतभिषा नक्षत्र सोडून भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहेत.
-
पूर्वा भाद्रपद नक्षत्रात गुरुचं वर्चस्व आहे. अशा स्थितीत शनिदेवाच्या नक्षत्रातील बदलाचा सर्व राशींवर नक्कीच काही ना काही प्रभाव पडणार आहे.
-
शनिदेवाने नक्षत्र बदलताच काही राशींच्या लोकांचं भाग्य उजळणार आहे. शनीच्या नक्षत्र बदलामुळे कोणत्या राशींना मोठा फायदा होईल, हे जाणून घेऊया.
-
शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचे मेष राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीतूनही नफा मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमची आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते. यावेळी वडिलांसोबत तुमचे संबंध चांगले राहू शकतात. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. तुम्ही घर आणि वाहन खरेदी करू शकता.
-
वृषभ राशीच्या लोकांना शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने फायदा होण्याची शक्यता आहे. अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. या काळात नोकरी किंवा व्यवसायात चांगले यश मिळवू शकाल. यासोबतच व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात.
-
मकर राशीच्या लोकांना या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित लोकांची आर्थिक स्थिती सुधारू शकते. नोकरीत असलेल्यांना पदोन्नती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. व्यापारात तुम्हाला मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसेही परत मिळू शकतात.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
-
(फोटो : सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
७ एप्रिलपासून ‘या’ राशींना मिळणार चांगला पैसा? शनिदेव नक्षत्र बदल करताच होऊ शकतात लखपती
Shani Dev Nakshatra Parivartan: शनिदेवाचे नक्षत्र परिवर्तन होताच काही राशींचे अच्छे दिन येऊ शकतात.
Web Title: Shani gochar 2024 saturn transit in purva bhadrapada nakshatra positive impact of these zodiac sing can get huge money pdb