-
आपला आहार/डाएट न सोडता पौष्टिक आणि प्रथिनयुक्त काही खायचे असेल तर काय बरं खावे? असा प्रश्न अनेकांना, खासकरून व्यायाम आणि वजन कमी करणाऱ्यांना पडतो. अशा हेल्थ कॉन्शिअस लोकांसाठी इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @nehadeepakshah या अकाउंटने पौष्टिक चिजी मटार कबाबची रेसिपी शेअर केली आहे, ती पाहा. [Photo credit – Freepik]
-
साहित्य – तेल, लसूण, आले, हिरव्या मिरच्या, कांदा, पालक, मटार, चणा डाळ, गरम मसाला, कसूरी मेथी, मीठ, मिरपूड, तूप, चीज [Photo credit – Freepik]
-
सर्वप्रथम गॅसवर एक कढई ठेऊन त्यामध्ये, थोडे तेल घालून घ्या. तेल तापल्यानंतर त्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कांदा, पालक, हिरवे मटार, शिजवलेली चणा डाळ आणि थोडा गरम मसाला घालून सर्व पदार्थ व्यवस्थित एकत्र करून शिजवून घ्यावे.[Photo credit – Freepik]
-
आता तयार भाज्यांचे मिश्रण गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून त्याची एक पेस्ट बनवून घ्या. पुन्हा कढईमध्ये भाज्यांची तयार केलेली पेस्ट मीठ आणि मिरपूड घालून शिजवून घ्यावी. शेवटी यामध्ये चवीसाठी थोडी कसुरी मेथी घालावी.[Photo credit – Freepik]
-
नंतर, तयार कबाब मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे तयार करताना यात थोडे चीज घालून गोळ्यांना, हातावर हलके चपटे करून त्यांना कबाबचा आकार द्यावा. [Photo credit – Freepik]
-
एक पॅन किंवा तवा घेऊन, त्यावर थोडेसे तूप पसरवून तयार कबाबचे गोळे सोनेरी होईपर्यंत खरपूस परतून घ्या.[Photo credit – Freepik]
-
तयार आहेत आपले प्रथिनयुक्त असे पौष्टिक मटार कबाब. हे कबाब तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता. तुपामध्ये हे कबाब परतल्यामुळे याची चव वाढण्यास मदत होते.[Photo credit – Freepik]
Recipe : पौष्टिक अन् प्रथिनयुक्त चिजी मटार कबाब! झटपट होतील तयार, कसे बनवायचे पाहा…
काही चटपटीत खावेसे वाटत असेल तर, आहाराची काळजी घेणारे हे पौष्टिक मटार कबाब बनवून पाहा. रेसिपी घ्या.
Web Title: Protein rich cheese matar kabab recipe how to make follow this simple and easy steps in marathi dha