-
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह वेळोवेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ज्याला ग्रहांचे संक्रमण किंवा राशिचक्र बदल म्हणतात.
-
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे अनेकदा एखाद्या राशीत ग्रहांची युती होते.
-
आता १८ महिन्यानंतर एप्रिल महिन्यात मीन राशीमध्ये बुध आणि मंगळाची युती होणार आहे. याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल.
-
परंतु यावेळी काही राशी अशा आहेत ज्यांच्यासाठी यावेळी अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
-
बुध आणि मंगळाची युती कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमची बचतही वाढू शकते. यावेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळात नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात.
-
मिथुन राशीच्या लोकांसाठी बुध आणि मंगळाची युती लाभदायी ठरु शकते. बऱ्याच काळापासून अडकलेले आपले पैसे आता परत मिळू शकतात. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. अडलेली सर्व कामं आता पूर्ण होऊ शकतात. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काही चांगल्या ऑफर्स मिळू शकतात.
-
बुध आणि मंगळ यांची जोडी तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते. वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. एखाद्याला पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा लाभ मिळू शकतो. यावेळी प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
-
(फोटो : सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
१८ महिन्यानंतर २ ग्रहांची युती; एप्रिलमध्ये ‘या’ राशींना होणार मोठा धनलाभ? पाहा तुमची रास आहे का यात?
Mars and Budh Yuti: एप्रिलमध्ये दोन ग्रहांची १८ महिन्यानंतर युती होणार आहे. या युतीमुळे काही राशींना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.
Web Title: Mangal and mercury conjunction made in meen big success these zodiac sign pdb