-
Summer Skin Care Tips : वाढत्या वयाचा वाढत्या उन्हाचा तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागतो. एवढ्या कडाक्याच्या उन्हात प्रत्येकाने स्वतःच आरोग्य नीट ठेवण्यासाठी हेल्थ टिप्स फॉलो केल्या पाहिजेत. (फोटो : Freepik)
-
सोबतच चेहऱ्याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. सुंदर दिसणे सर्वांनाच आवडते. यासाठी लोक अनेक प्रयत्नही करतात. तुम्हालाही चमकदार त्वचा मिळवायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. (फोटो : Freepik)
-
तुम्ही घरच्या घरी दुधाची साय किंवा मलई लावू शकता. कोरड्या त्वचेसाठी दुधाची साय खूप फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया त्वचेवर दुधाची साय कशी लावायची.(फोटो : Freepik)
-
दुधाची साय त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी देखील खूप मदत करते. यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते जे पिंपल्स आणि बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करते.(फोटो : Freepik)
-
चेहऱ्यावर मलई लावण्यापूर्वी तुम्ही तुमचा चेहरा पूर्णपणे धुवा आणि स्वच्छ करा, नंतर हलक्या हातांनी चेहऱ्यावर थोडीशी मलई लावा. यानंतर, हलक्या हाताने मसाज करा आणि २० मिनिटे राहुद्यात.(फोटो : Freepik)
-
त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. हे आठवड्यातून एक किंवा दोनदा करा जेणेकरून तुमची त्वचा गोरी आणि चमकदार राहील. तुम्ही याचा वापर फेस मास्क, क्लिन्जर किंवा मॉइश्चरायझर म्हणूनही वापर करू शकता.(फोटो : Freepik)
-
फेस मास्कसाठी, तुम्हाला एक चमचा मलई घ्या. नंतर त्यात थोडे मध घाला आणि चेहऱ्यावर लावा, त्यानंतर २० मिनिटे ठेवा आणि कोमट पाण्याने धुवा. क्लींजर बनवण्यासाठी तुम्हाला एक चमचा बेसन आणि एक चमचा मलई मिसळावी लागेल.(फोटो : Freepik)
-
नंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावून हळू हळू मसाज करा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. (फोटो : Freepik)
-
म्हणूनच क्रीम काही लोकांना सूट करते आणि इतरांना नाही, जर तुम्हाला त्याची ऍलर्जी असेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.(फोटो : Freepik)
चेहऱ्यावर चमचाभर दुधाची साय लावा; दिसाल तरूण-सुंदर, मिळतील फायदेच फायदे
Summer Skin Care Tips: उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचा खूप कोरडी होते. त्वचेच्या कोरडेपणा दूर करण्यासाठी तुम्ही चेहऱ्यावर दुधाची साय लावू शकता. कसे ते येथे पाहा.
Web Title: How to soften your face with malai dry skin care summer skin care tips srk