-
एका कार्यक्रमात नीता यांनी मरून रंगाचा गाऊन परिधान केला होता ज्यावर अगदी साधीच पण देखणी अशी फ्रेंच बन हेअर स्टाईल केली होती. हा बन सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट अमित ठाकूर याने केला होता
-
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग दरम्यान अनेक रील्स व्हायरल झाल्या त्यातली एक गाजलेली रील म्हणजे नीता अंबानी यांचा कॉकटेल पार्टी लुक
-
अमित ठाकूर हा फक्त नीता अंबानीच नव्हे तर प्रियांका चोप्रा पासून ते आलिया भटपर्यंत अनेकांना स्टाईल करतो. त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर त्याच्या कामाचं कौतुक करणारे अनेक फॉलोवर्स आहेत
-
तर याच सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट अमित ठाकूरने एका रीलमध्ये त्याने केस तुटणे थांबवण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत, विशेष म्हणजे एक नवा रुपयाही खर्च न कर तुम्हाला या टिप्सचे पालन करता येणार आहे
-
अमित सांगतो की, सगळी कामं उरकल्यावर रात्री केस धुवून झोपायची काहींना सवय असते, असे करताना केस ओले ठेवून कधीच झोपू नये. कारण एकतर केस ओले असताना सर्वात दुबळे असतात त्यात झोपेत त्यांची ओढाताण झाल्यास केस पटकन तुटू शकतात
-
केस हलके ओले असताना किंवा थंड असताना त्यावर स्ट्रेटनिंग किंवा कर्लिंग मशीन फिरवू नये. इस्त्री वगैरे फिरवण्याचा प्रकार तर चुकूनही करू नये. यामुळे केस तुटण्याची शक्यता असतेच पण त्याच बरोबर स्प्लिट्स एंड्स सुद्धा वाढू शकतात
-
तिसरी महत्त्वाची टीप म्हणजे झोपताना कधीच केस मोकळे सोडून झोपू नका. यामध्ये खेचल्याने केस तुटू शकतात ही शक्यता जरी बाजूला ठेवली तरी अनेकदा बेडशीट आणि केसाचे फ्रिक्शन होऊन (घासले जाऊन) सुद्धा केस सहज तुटून पडू शकतात
-
अमितने सुचवल्याप्रमाणे आपण झोपताना सैलसर वेणी घालून किंवा पोनी बांधून झोपू शकता. तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा. (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
नीता अंबानी, आलियाच्या हेअर स्टायलिस्टने सांगितल्या केसांसाठी शून्य रुपयाच्या ३ हॅक्स; झोपताना व केस धुतल्यावर..
Zero Rupees Hair Care Tips: अमित ठाकूर हा फक्त नीता अंबानीच नव्हे तर प्रियांका चोप्रा पासून ते आलिया भटपर्यंत अनेकांना स्टाईल करतो, एक नवा रुपयाही खर्च न कर तुम्हाला या टिप्सचे पालन करता येणार आहे.
Web Title: Neeta ambani alia priyanka chopra hair stylist amit thakur shares 3 hacks for hair in zero rupees washing hair tying while sleeping svs