-
वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर आपल्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी एप्रिल महिन्यात अनेक प्रमुख ग्रहांच्या स्थितीतील बदल होणार आहेत.
-
हे बदल काही राशींसाठी फायदेशीर ठरू शकतात. विशेष म्हणजे, लवकरच शुक्र आपली राशी बदलतील.
-
शुक्र ग्रह सुख-समृद्धीचा कारक मानला जातो. ज्योतिष्य शास्त्रानुसार,२४ एप्रिलला शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. या गोचरमुळे काही राशींच्या लोकांचे भाग्य उजळण्याची शक्यता आहे.
-
कर्क या राशीच्या लोकांसाठी शुक्र गोचरमुळे शुभ परिणाम मिळण्याची शक्यता आहे. घर-जमीन, वाहन, मालमत्ता यांचे सुख मिळू शकते. नोकरदारांना चांगली वेतनवाढ आणि बढती मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांची व्यवसायात प्रगती होऊ शकते आणि त्यांच्या व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो.
-
शुक्र गोचरमुळे सिंह राशीच्या लोकांना चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत तुम्हाला सापडू शकतात. नवीन व्यवसाय सुरू करणे फायदेशीर ठरु शकते. व्यावसायिकांना यावेळी चांगला नफा होऊ शकतो.
-
धनाचा दाता शुक्राच्या राशीतील बदल मकर राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून पैसेही मिळू शकतात. यावेळी तुम्हाला न्यायालयीन खटल्यांमध्ये विजय मिळू शकतो. या काळात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
-
(फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
हनुमान जयंतीनंतर ‘या’ राशी होतील बलाढ्य धनवान? शुक्र देवाच्या कृपेने मिळू शकते नशिबाला कलाटणी
Shukra Gochar In Mesh: शुक्र ग्रहाचे गोचर होताच काही राशींना आयुष्यात अपार यश लाभण्याची शक्यता आहे.
Web Title: Shukra gochar 2024 venus planet transit in mesh these zodiac sing positive impact can get huge money pdb