-
ज्योतिषशास्त्रात बुध हा शुभ ग्रह मानला जातो. बुध शुभ स्थितीत असल्यामुळे लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊन चांगला आर्थिक लाभ होतो.
-
बुध ग्रह चाल बदलतो, तेव्हा काही राशींना खूप फायदा होतो. आर्थिक बाबतीत आणि करिअरमध्ये प्रगती होते. बुध ग्रह एकाच राशीत एक महिना राहतो आणि नंतर आपली चाल बदलतो.
-
आता बुधदेव २५ एप्रिलला संध्याकाळी ५ वाजून ४९ मिनिटांनी मीन राशीमध्ये मार्गी होणार आहेत. बुधाच्या मार्गी स्थितीचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर दिसून येणार आहे.
-
मात्र, यावेळी तीन राशी अशा आहेत, ज्यांना बुधाच्या मार्गीचा फायदा होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया बुधाच्या मार्गीचा कोणत्या राशीच्या व्यक्तींना फायदा होऊ शकतो.
-
बुध ग्रहाचे मार्गी होणे मिथुन राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. करिअर आणि व्यवसाय यांसाठी हा काळ अत्यंत चांगला ठरु शकतो. या कालावधीत व्यक्तीच्या प्रगतीचे सर्व दरवाजे आपोआप उघडले जाऊ शकतात. रखडलेले पैसे परत मिळू शकतात. या कालावधीत कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यशप्राप्ती होऊ शकेल.
-
बुधदेवाचे मार्गी होणे कर्क राशीच्या लोकांसाठी अच्छे दिन घेऊन येणारे ठरु शकते. तुम्हाला व्यवसायात मोठ्या यशासह आर्थिक लाभही मिळू शकतो. तसेच व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.
-
बुधदेवाचे मार्गी होणे मीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. नोकरदार लोक नवीन नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना नवीन संधी मिळू शकतात. विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होण्याची शक्यता आहे.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)
-
(फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
२५ एप्रिलपासून ‘या’ राशींना होणार बक्कळ धनलाभ? बुधदेवाच्या कृपेने नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
Budh Margi 2024: बुध ग्रहाच्या मार्गी होण्याने काही राशींवर पैशाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
Web Title: Budh margi 2024 budh margi in meen these zodiac sing can get huge money pdb