-
वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ज्योतिष शास्त्रात शनि ग्रहाला खूप महत्त्व दिलं जातं.
-
सर्व ग्रहांमध्ये शनि हा सर्वात मंद गतीने जाणारा ग्रह आहे, एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी त्याला सुमारे अडीच वर्षे लागतात, त्यामुळे शनीला पुन्हा त्याच राशीत जाण्यासाठी ३० वर्षे लागतात.
-
शनिदेव सध्या कुंभ राशीत विराजमान आहेत. २०२५ मध्ये शनिदेव राशी परिवर्तन करणार आहेत. शनिदेव कुंभ राशीत असल्याने ‘शश राजयोग’ निर्माण होत आहे. हा राजयोग खूप शुभ मानण्यात येते.
-
हा शश राजयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. यामुळे कोणत्या राशींच्या आयुष्यात सुखाचे क्षण येणार आहेत, हे पाहूयात…
-
शश राजयोग बनल्याने वृषभ राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबात सुख समृद्धी वाढण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीची संधी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना मोठा लाभ होऊ शकतो. तुमच्या आयुष्यात मोठा आणि सकारात्मक बदल घेऊन येणार आहे.
-
शनिदेवाच्या कृपेने मकर राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे. कोर्ट केसेसमधून तुम्हाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ प्रलंबित आणि रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. तुम्ही व्यवसाय किंवा करिअरमध्ये चांगला निर्णय घेऊ शकता.
-
शश राजयोग बनल्याने कुंभ राशीच्या लोकांना सुखाचे दिवस अनुभवता येऊ शकतात. नोकरदारांना बढती मिळण्याची चिन्हे आहेत. व्यापारी वर्गातील लोकांना या वर्षी चांगला नफा मिळू शकतो. मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होऊ शकतो.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
-
(फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
शनिदेवाच्या ‘शश राजयोगा’मुळे ‘या’ राशींचे नशीब पालटणार? शनिदेवाच्या कृपेने मिळू शकतो प्रचंड पैसा
Shash Rajyog: शश राजयोग बनल्याने काही राशींचे अच्छे दिन सुरु होण्याची शक्यता आहे.
Web Title: Shani gochar 2024 saturn made shash rajyog these zodiac sing can get huge money pdb