-
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी बदलतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो.
-
आता येत्या १४ मे रोजी ग्रहांचा राजा सूर्य वृषभ राशीत प्रवेश करेल. तर १९ मे रोजी शुक्र वृषभ राशीत प्रवेश करेल. ज्यामुळे ‘शुक्रादित्य राजयोग’ तयार होईल.
-
याआधी एप्रिलमध्ये मेष राशीत दोन्ही ग्रह एकत्र आल्याने हा राजयोग तयार झाला होता. हा राजयोग दहा वर्षांनंतर होणार आहे. यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते.
-
तसेच या लोकांच्या संपत्तीतही वाढ होऊ शकते. जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी ज्यांना या राजयोगामुळे अधिक लाभ होऊ शकतो.
-
वृषभ राशीच्या लोकांना शुक्रादित्य योग तयार झाल्याने खूप फायदा होऊ शकतो. तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात. शुभ वार्ता मिळण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गाला कामासंदर्भात प्रवास करावा लागू शकतो. आर्थिक समस्यांपासून सुटका होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना एखादं नवं डील मिळू शकतं.
-
शुक्रादित्य राजयोग बनल्याने मिथुन राशीच्या लोकांना चांगला फायदा होऊ शकतो. तुम्हाला नवीन नोकरी देखील मिळू शकेल. जर तुमचा कोणताही बिझनेस डील पूर्ण होत नसेल तर या काळात तुमचा बिझनेस डील तर पूर्ण होऊ शकतो. अडकलेले पैसेही परत मिळू शकतात.
-
सिंह राशीच्या लोकांना शुक्रादित्य राजयोग बनल्याने मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढवण्याचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
१९ मे पासून ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु? दहा वर्षांनी ‘शुक्रादित्य राजयोग’ बनल्याने नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
Subh Yog: तब्बल दहा वर्षांनी शुभ राजयोगाची निर्मिती होताच काही राशींना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.
Web Title: Surya and shukra will make shukraditya rajyoga these zodiac sing can get huge money pdb