Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. homemade dahi recipe how to make perfect curd at home in summer ndj

Kitchen Jugaad : असे बनवा घरच्या घरी चांगले घट्ट दही, जाणून घ्या ‘या’ खास टिप्स

घरच्या घरी चांगले दही बनविण्यासाठी मास्टर शेफ शिप्रा खन्ना यांनी खास टिप्स सांगितल्या आहेत.

May 12, 2024 11:36 IST
Follow Us
  • Homemade Dahi recipe
    1/12

    सध्या उन्हाळा सुरू आहे आणि तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. अशात उन्हाळ्यात उष्णतेपासून वाचण्यासाठी आपण थंड पदार्थ आणि विविध थंड पेयांचे सेवन करतो. त्यापैकी सर्वांना आवडणारा पदार्थ म्हणजे दही. (Photo : Freepik)

  • 2/12

    तुम्हीही बाजारातून दही खरेदी करता का? पण तुम्हीही घरच्या घरी सोप्या पद्धतीने दही बनवू शकता. या उन्हाळ्यात शरीराला आवश्यक पोषक घटक पुरविणारे दही तुम्ही घरीच बनवू शकता. द इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांच्या हवाल्याने दह्याचे फायदे सुद्धा सांगितले आहेत. (Photo : Freepik)

  • 3/12

    दह्यामध्ये प्रो-बायोटिक्स असतात; जे आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. जिंदाल नेचरक्योर इन्स्टिट्यूटच्या आहारतज्ज्ञ सुषमा पी. एस. सांगतात, “दही पौष्टिक आणि घट्ट असते. त्यामध्ये असलेले प्रोटिन्स, कॅल्शियम, फॉस्फरस व जीवनसत्त्व ब हे घटक शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.”
    घरच्या घरी चांगले दही बनविण्यासाठी मास्टर शेफ शिप्रा खन्ना यांनी खास टिप्स सांगितल्या आहेत. (Photo : Freepik)

  • 4/12

    ताजे दूध वापरा
    चांगले दही बनवfण्यासाठी नेहमी ताजे दूध वापरा. अल्ट्रापेस्टुराइज्ड दूध (ultrapasteurised milk) वापरणे टाळा. कारण- असे दूध वापरल्यामुळे दही नीट तयार होत नाही. (Photo : Freepik)

  • 5/12

    स्टार्टर म्हणून थोडे ताजे दही वापरा.
    दही बनवfण्यासाठी तुम्ही स्टार्टर म्हणून थोडे ताजे दही वापरू शकता.(Photo : Freepik)

  • 6/12

    योग्य तापमानात ठेवा
    दही उष्ण तापमानात ठेवा. ४३ अंश सेल्सिअसवर ठेवू शकता. (Photo : Freepik)

  • 7/12

    स्वच्छ भांडे
    दह्यात अतिप्रमाणात जीवाणू निर्माण होऊ नये म्हणून शक्यतो मातीचे भांडे किंवा स्वच्छ भांडे वापरा. (Photo : Freepik)

  • 8/12

    वेळ द्या
    तापमानानुसार दही तयार होण्यासाठी ४ ते १२ तास लागू शकतात. (Photo : Freepik)

  • 9/12

    वारंवार तपासणी
    उन्हाळ्यात जाड असे मलईदार दही तयार व्हावे साठी दही वारंवार तपासा. (Photo : Freepik)

  • 10/12

    फ्रिजमध्ये ठेवा
    एकदा दही तुमच्या इच्छेनुसार तयार झाल्यानंतर आंबवण्याची प्रक्रिया थांबविण्यासाठी आणि दह्याचा ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी दही थंड करण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा. (Photo : Freepik)

  • 11/12

    स्टार्टर म्हणून थोडे दही बाजूला काढा
    घरच्या घरी तयार केलेल्या दह्याचा आस्वाद घेण्यापूर्वी थोडे दही स्टार्टर म्हणून बाजूला काढा. पुढच्या वेळी दही बनविताना तुम्ही या दह्याचा वापर करू शकता. (Photo : Freepik)

  • 12/12

    नवनवीन प्रयोग करून पाहा
    दही बनविताना बकरी किंवा मेंढीचे दूध वापरून पाहा. दह्यामध्ये वेगळेपण आणण्यासाठी दही तयार झाल्यानंतर त्यात तुम्ही मध, गूळ व फळे टाकू शकता. (Photo : Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Homemade dahi recipe how to make perfect curd at home in summer ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.