-
खजूर हे जीवनसत्त्वे सी आणि डीचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत. यामुळे शरीरात कोलेजनचे उत्पादन वाढवण्यास मदत होते आणि लवचिकता वाढते.
-
त्याचबरोबर खजूर अँटिऑक्सिडंट्सनेही समृद्ध आहेत. यांच्या सेवनाने आपल्याला पेशींचे नुकसान आणि जळजळ होण्यापासून रक्षण होते.
-
कच्चे खजूर खाल्ल्याने शरीरातील ऊतींची ताकद वाढते आणि त्वचा मऊ आणि नितळ होते. खजूरचा आणखी एक फायदा म्हणजे सामान्यतः संपूर्ण शरीरात पासरणाऱ्य त्वचेच्या ऍलर्जीवर उपचार करणे.
-
आज आपण स्किनकेअरसाठी खजूरचा वापर कसा करावा याच्या काही टिप्स जाणून घेऊया.
-
सुक्या खजूरचा वापर फेस स्क्रब म्हणून केला जाऊ शकतो. साधारण ४-५ खजूर घेऊन रात्री एक कप दुधात भिजवून ठेवावेत. नंतर, भिजवलेले खजूर मिक्सरमध्ये बारीक वाटून त्यात एक चमचा मध आणि रवा घालावा. हे मिश्रण फेस स्क्रब म्हणून वापरता येऊ शकते.
-
फेस पॅक बनवण्यासाठीही सुक्या खजूरचा वापर केला जाऊ शकतो. त्यासाठी साधारण ४-५ खजूर रात्री एक कप दुधात भिजवेत. नंतर मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट तयार करावी.
-
पेस्ट तयार झाल्यावर त्यात एक चमचा दुधाची साय आणि एक चमचा लिंबू घालून मिश्रण चेहऱ्याला लावावे. असे आढळून आले आहे की हे मिश्रण लावल्याने त्वचेला चमक येते.
-
कोरड्या खजुरापासून बनवलेले स्क्रब आणि फेस पॅक त्वचेला आर्द्रता प्रदान करण्यास आणि कोरड्या त्वचेची समस्या टाळण्यास मदत करतात. असेही आढळून आले आहे की खजुरापासून बनवलेले फेस पॅक टॅनिंग आणि सनबर्न दूर करण्यास मदत करतात.
-
एवढेच नाही तर व्हाईटहेड्स आणि ब्लॅकहेड्सपासून मुक्ती मिळवण्यासाठी खजूर खूप प्रभावी ठरू शकतात. स्किनकेअरचा एक प्रकार म्हणून खजूर वापरल्यास त्वचा हायड्रेट राहते आणि बारीक रेषा, सुरकुत्या आणि मुरुम यासारख्या समस्या दूर करण्यात मदत होते.
-
खजूर केवळ त्वचेसाठीच उपयुक्त नाही, तर ते केसांनाही निरोगी ठेवतात. खजूर केस धुण्यासाठी देखील वापरले जाऊ शकतात.
-
१०-१२ खजूर घ्या आणि पाण्यात उकळा. खजूर उकळल्यानंतर पाणी थंड होऊ द्या. पाणी थंड झाल्यावर केस हे पाणी धुण्यासाठी वापरा. तथापि, पाण्याने केस धुताना शॅम्पूचा वापर करू नये.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (सर्व फोटो : फ्रीपिक)
स्कीन केअर रुटीनमध्येही खजूर अतिशय गुणकारी; घरच्या घरी ‘असा’ बनवा फेसपॅक आणि स्क्रब
आज आपण स्किनकेअरसाठी खजूरचा वापर कसा करावा याच्या काही टिप्स जाणून घेऊया.
Web Title: Skin care routine for blackheads whiteheads dates face scrub facepack haircare khajur benefits pvp