-
परफेक्ट फिगर मिळविणे ही प्रत्येक महिलेची इच्छा असते. पण वाढत्या वयाबरोबर प्रत्येक टप्प्यात महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल होत असतात. त्यामुळे परफेक्ट फिगर मिळविणे आव्हानात्मक होऊ बसते.
-
यात आजकालच्या महिला तीन गोष्टींमुळे त्रस्त आहेत. एक म्हणजे नितंबाचा वाढता आकार, दुसरं म्हणजे सुटलेलं पोट व तिसरी म्हणजे मांड्यांची वाढती चरबी. या सर्व गोष्टींमुळे संपूर्ण शरीर ओबडथोबड आणि पसरल्यासारखे दिसू लागते.
-
पण या गोष्टींवर वेळीच नियंत्रण मिळवले नाही, तर या समस्या आणखी वाढतात. अशाने तुमचा शरीराचा पूर्ण लूक तर खराब होतो. त्याशिवाय भविष्यात चालतानाही त्रास होऊ लागतो.
-
म्हणून सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर या अशा लोकांसाठी एक असा व्यायामप्रकार घेऊन आल्या आहेत; जो रोज फॉलो केल्यास तुम्ही तीन महिन्यांत एकदम परफेक्ट फिगर मिळवू शकता.
-
सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे; ज्यामध्ये त्यांनी परफेक्ट फिगर मिळविण्यासाठी एक सोपा व्यायामप्रकार स्टेप बाय स्टेप दाखवला आहे.
-
सर्वप्रथम नीट उभे राहा. त्यानंतर आपल्या मांड्यांमध्ये योगा ब्लॉक ठेवा. दोन्ही मांड्यांमध्ये तो ब्लॉक अशा प्रकारे ठेवा; जेणेकरून तो योगा करताना खाली पडणार नाही.
-
आता दोन्ही हात समोरच्या दिशेने करून, पाय दुमडून या योगा ब्लॉकसह खुर्चीच्या पोजमध्ये खाली बसा. आता पुन्हा उभे राहा आणि आपले हात त्याच दिशेने ठेवा.
-
तुम्हाला हा व्यायाम पाच सेटमध्ये तीन महिने सतत या पद्धतीने करावा लागेल.
-
हा व्यायाम करण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वप्रथम हे आपल्या मांड्यांवरील अतिरिक्त चरबी कमी करण्यास फायदेशीर आहे. कारण- जेव्हा तुम्ही हा व्यायामप्रकार करता, तेव्हा मांड्यांच्या स्नायूंवर ताण येतो, त्यामुळे चरबी वितळते आणि मग मांड्यांची चरबी कमी होण्यास मदत होते.
-
दुसरे म्हणजे नितंबावरील चरबी कमी करण्यास मदत करते जेव्हा तुम्ही वर-खाली अशी हालचाल करता आणि विटांमुळे मांड्यांमध्ये अंतर असते, तेव्हा नितंबांच्या चरबीवर ताण येतो. त्यामुळे हिप फॅट कमी होण्यास मदत होते.
-
परंतु तुम्हाला पायांशी संबंधित काही त्रास असेल किंवा इतर कोणताही आजार, तर हा व्यायामप्रकार करताना आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. (Photos – Freepik)
Weight Loss: ३ महिन्यांत दिसेल अभिनेत्रींप्रमाणे एकदम परफेक्ट फिगर; रोज फक्त १० मिनिटे करा ‘हा’ व्यायाम प्रकार
How to get a lean fit body : तीन महिने फक्त १० मिनिटे हा व्यायाम केल्यास तुम्ही एक मेंटेन फिगर मिळवू शकाल. कसे ते पाहू…
Web Title: Diy weight loss perfect body shapping workout how to get slim body rujuta diwekar exercise yoga tips for reduce butt and thigh fat at home sjr