-
‘तुझी ही सवय सोड’ असं आपल्यातील प्रत्येक जण एकमेकांना सतत बोलत असतो. कारण – आरोग्यासाठी जीवनात चांगल्या सवयी असणं फार गरजेचं आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
यामुळे आयुष्यातील अर्ध्या अडचणी आपोआप कमी होतात, असं म्हणतात. खाण्यापिण्याच्या आणि जीवनशैलीशी संबंधित सवयी आपल्या आरोग्यावर परिणाम करतात. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल घडवायचा असेल तर स्वतःला पुढील सात सवयी नक्की लावा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
१. वेक अप कॉल – रोज ठरलेल्या वेळात उठण्याची सवय तुमच्या शरीराला लावा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
२. एक दिनचर्या तयार करा – तुमच्या खाण्या-पिण्याची वेळ, ऑफिसला जाण्याची वेळ आदी गोष्टींसाठी एक वेळापत्रक तयार करा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
३. नियमित व्यायाम करा – दीर्घ श्वास घ्या, योगा करा, ध्यान करा. नाही तर वर्कआउट करा किंवा फिरायला जा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
४. कृतज्ञता व्यक्त करा – चेहऱ्यावर हास्य ठेवून तुमच्या दिवसाची सुरुवात करा आणि तुमच्याकडे जे आहे त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
५. रात्री कुटुंबाबरोबर एकत्र जेवा – दिवसातून एकदा तरी तुमच्या कुटुंबाबरोबर गप्पा-गोष्टी करत जेवणाचा आनंद घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
६. डायरी लिहा – तुमच्या सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींचे वर्णन करणे नेहमीच एक चांगली गोष्ट आहे. चांगले असते. तुमच्या चांगल्या गोष्टी एका डायरीत लिहा आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
७. रात्री वेळेत झोपा – निरोगी मन आणि शरीरासाठी वेळेवर झोपणे अगदीच महत्वाचे आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
सवयी बदला, आयुष्य बदलेल! फक्त ‘हे’ सात सकारात्मक बदल स्वतःमध्ये करा; आयुष्याला येईल नवं वळण
तुमच्या आयुष्यात बदल घडवायचा असेल तर तुमच्या सवयी बदलून पाहा…
Web Title: These seven habits that will change your life spend at least one hour every day doing something for yourself asp