Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. potatoes sprouts green stains can be avoided for 30 days aajicha batwa upaay put these things in kanda batata basket kitchen jugaad saving money svs

३० दिवस बटाटे मोड न येता, हिरवे- काळे न पडता राहतील ताजे; कांदा- बटाट्याच्या परडीत या वस्तू ठेवाच, पाहा आजीचे उपाय

How To Avoid Potatoes Sprouts: चटकन कापला, पटकन शिजवला, आणि चवीने खाल्ला असा भाजीचा एकमेव प्रकार म्हणजे बटाटा. हाच बटाटा व तुमचे पैसे वाचवण्यासाठी आपण आज आजीच्या बटव्यातील काही उपाय पाहणार आहोत.

June 1, 2024 20:00 IST
Follow Us
  • How To Avoid Potatoes Sprouts Money Saving Kitchen Jugaad
    1/9

    How To Avoid Potatoes Sprouts: जेव्हा आपण साठवायला बटाटे आणतो तेव्हा त्याचा नीट बंदोबस्त न केल्यास मोड/ अंकुर येऊन अनेकदा बटाटे मऊ होऊन कुजतात. हे टाळण्यासाठी आज आपण खास आजीच्या बटव्यातील काही घरगुती उपाय पाहणार आहोत

  • 2/9

    बटाटे हे शक्यतो अंधारात ठेवल्यावर त्यांना मोड येण्याचे प्रमाण कमी होते. बटाटे सहसा कोरड्या जागेत ठेवल्यास सडत नाहीत पण उन्हात ठेवल्यास त्याला अंकुर फुटू शकतात. हवेशीर जागी बटाटे ठेवा पण तिथे थोडा अंधारच असेल असे पाहा

  • 3/9

    कोणतीही हिरवी औषधी वनस्पती तुम्हाला बटाटे ताजे ठेवण्यास आणि त्यामध्ये अंकुर फुटणे टाळण्यास मदत करू शकते. एखादी कापसाची, मलमलची पिशवी घ्या त्यात हर्ब्स किंवा पालेभाजी ठेवा व मग त्यात बटाटे भरून ठेवा

  • 4/9

    सफरचंद, संत्री किंवा अन्य फळे बटाट्यासह ठेवू नका. कांदे आणि सफरचंद इथिलीन वायू उत्सर्जित करतात, ज्यामुळे अंकुर येण्याच्या प्रक्रियेला गती मिळते यावरून झालेल्यास काही अभ्यासात असेही दिसून आले आहे की सफरचंदामुळे बटाटे मऊ होऊ शकतात

  • 5/9

    तर काही अभ्यासांमध्ये सफरचंद बटाट्यांसह ठेवल्याने अंकुर फुटण्याचा वेळ वाढल्याचे सुद्धा दिसून आले आहे. खबरदारी म्हणून आपण जास्त पाणीदार फळे बटाट्यांसह स्टोअर करणे टाळा

  • 6/9

    बटाट्यांच्या आजूबाजूला आर्द्रता असेल तर पटकन अंकुर फुटू शकतात. बटाटे साठवून ठेवताना सुद्धा ते ओले नसतील याची खात्री करा.

  • 7/9

    बटाट्याला लागलेली धूळ फडक्याने पुसून घ्या व जेव्हा तुम्ही बटाटे चिरायला घ्याल तेव्हाच पाण्याने धुवा. बटाटे रेफ्रिजरेटरमध्ये तर चुकूनही ठेवू नका

  • 8/9

    रद्दीतील कागदांचे तुकडे करून आपल्याला बटाट्याच्या परडीत ठेवायचे आहेत. यामुळे बटाट्यामध्ये ओलसरपणा राहण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे बटाट्यांना कोंब येण्याचे प्रमाण कमी होते.

  • 9/9

    बटाट्यांना ३० ते १४० दिवसांनी नैसर्गिकरित्याच अंकुर फुटण्यास सुरुवात होते. बटाट्याला मोड आल्याचे लक्षात आल्यास वेळीच कापून टाका. व असे बटाटे शक्यतो लवकरच वापरून टाका.(सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Potatoes sprouts green stains can be avoided for 30 days aajicha batwa upaay put these things in kanda batata basket kitchen jugaad saving money svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.