• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. carrot rice recipe gajracha bhat recipe in marathi fried rice recipe in marathi srk

कमीत कमी साहित्यात बनवा बिर्याणी सारखा चविष्ट गाजर भात; ‘ही’ घ्या सोपी रेसिपी

चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीमध्येही मोठी विविधता आहे. काही मैल अंतर पार केलं की त्यामधील वेगळेपण लक्षात येतं. अशीच एक आगळी वेगळी रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

June 14, 2024 17:29 IST
Follow Us
  • Carrot Rice Recipe
    1/9

    पूर्वी लग्नाचा मेन्यू म्हटलं की मसाले भात, जिलेबी आणि मठ्ठा अगदी हमखास असायचे. हल्ली लग्नाच्या मेन्यूमध्येही मोठे वैविध्य आढळते. (फोटो : Cookpad)

  • 2/9

    पण अजूनही लग्नमंडपात शिरलं की भूक चाळवणारा मसाले भात सगळ्यांना हवाहवासा वाटतो. चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीमध्येही मोठी विविधता आहे. (फोटो : Cookpad)

  • 3/9

    काही मैल अंतर पार केलं की त्यामधील वेगळेपण लक्षात येतं. अशीच एक आगळी वेगळी रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.(फोटो : Cookpad)

  • 4/9

    गाजराचा भातासाठी साहित्य २ मोठे गाजर, ४ हिरव्या मिरच्या, गरम मसाला, दोन लवंगा, चार काळी मिरी, एक वेलदोडा, तमालपत्र, दालचिनीचा तुकडा, फोडणीसाठी जीरे मोहरी, हिंग कढीपत्ता, २ चमचे आले-लसूण पेस्ट, १/४ वाटी, १ कांदा, १ टोमॅटो, १ चमचा, १/२ चमचा गरम मसाला, २ चमचे तूप, १ चमचा तेल (फोटो : Freepik)

  • 5/9

    प्रथम गाजराची साल काढून एक गाजर किसून घ्यावा आणि एका गाजराच्या बारीक फोडी कराव्यात. नंतर तांदूळ धुऊन घ्यावेत. (फोटो : Freepik)

  • 6/9

    गॅसवर कुकर ठेवा यामध्ये दोन चमचे तूप, एक चमचा तेल घाला. जीरे मोहरी हिंग कढीपत्त्याची फोडणी करा. नंतर आले लसूण पेस्ट परतून घ्या, कांदा बारीक कट करून परतून घ्या, त्यानंतर टोमॅटो परतून घ्या हिरवी मिरची परतून घ्या यामध्येच खडे मसाले टाका.(फोटो : Freepik)

  • 7/9

    कांदा टोमॅटो गुलाबीसर झाल्यानंतर यामध्ये गाजराचे तुकडे गाजराचा कीस हिरवा मटार अशा भाज्या टाकत दोन ते तीन मिनिटे परतून घ्या. (फोटो : Freepik)

  • 8/9

    त्यानंतर तांदूळ परता यामध्ये लाल तिखट मीठ गरम मसाला हे सर्व घालून परता आणि भातामध्ये गरम पाणी घालून झाकण लावून दोन शिट्ट्या करा.(फोटो : Freepik)

  • 9/9

    पंधरा मिनिटं कुकर थंड होऊ द्या. गरम गरम भात दह्यासोबत किंवा लोणच्या पापड सोबत सर्व्ह करा.(फोटो : Freepik)

TOPICS
इंडियन फूडIndian FoodफूडFoodरेसिपीRecipeलाइफस्टाइलLifestyleहेल्दी फूडHealthy Food

Web Title: Carrot rice recipe gajracha bhat recipe in marathi fried rice recipe in marathi srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.