-
लहान मुलांना पॉपकार्न, चिप्स, कुरकुरे यांसारखे पॅकेटचे पदार्थ खायला खूप आवडते. (Photo : Loksatta)
-
अनेकदा पालकांना माहिती असते की हे पदार्थ मुलांच्या आरोग्यासाठी चांगले नाही तरीसुद्धा मुलांचे मन दुखवू नये म्हणून पालक त्यांना विकत घेऊन देतात पण पालकांनो, आता तुम्हाला असे करावे लागणार नाही. (Photo : Loksatta)
-
कारण आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी चटकदार क्रंची कुरकुरे कसे बनवायचे, हे सांगणार आहोत. (Photo : Loksatta)
-
तुम्ही घरच्या घरी हेल्दी आणि टेस्टी कुरकुरे बनवू शकता. त्यासाठी ही सोपी रेसिपी लगेच नोट करा. (Photo : Loksatta)
-
साहित्य
तांदळाचं पीठ, बेसन, मैदा, मीठ, बेकींग पावडर, तेल, लाल मिरची पाव डर आणि चाट मसाला (Photo : Loksatta) -
अर्धा वाटी तांदळाचं पीठ घ्या. त्यात दोन चमचे बेसन घ्या
त्यात एक चमचा मैदा, चवीनुसार मीठ, आणि चिमुटभर बेकींग पावडर टाकावा.त्यानंतर त्यात पाणी टाकावं आणि सर्व मिश्रण एकत्रित करुन घ्या. पातळ मिश्रण तयार होईल. (Photo : Loksatta) -
त्यानंतर हे मिश्रण कढईत टाका आणि कमी आचेवर हे मिश्रण शिजवा
हे मिश्रण घट्ट होईल.त्यानंतर त्यावर झाकण ठेवून पाच ते सात मिनिटे शिजू द्या. (Photo : Loksatta) -
त्यानंतर हे मिश्रण थंड होऊ द्या. खूप जास्त थंड होऊ देऊ नये.
त्यानंतर या मिश्रणापासून कुरकुरे बनवा आणि नंतर हे कुरकुरे मंद आचेवर गरम तेलातून तळून घ्या. (Photo : Loksatta) -
एका भांड्यात तळलेले कुरकुरे काढू घ्या. या कुरकुऱ्यावर लाल मिरची पावडर, मीठ आणि चाट मसाला टाका. सर्व मिश्रण चांगले एकत्र करा.
तुमचे कुरकुरे तयार होईल. (Photo : Loksatta)
Kurkure Recipe : असे बनवा घरी क्रंची कुरकुरे, पॅकेटसारखी चव येईल; जाणून घ्या, ही सोपी रेसिपी
आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी चटकदार क्रंची कुरकुरे कसे बनवायचे, हे सांगणार आहोत. तुम्ही घरच्या घरी हेल्दी आणि टेस्टी कुरकुरे बनवू शकता. त्यासाठी ही सोपी रेसिपी लगेच नोट करा.
Web Title: Kurkure recipe how to make crispy kurkure homemade recipe ndj