• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. marathwada special sushila recipe in marathi how to make sushila ndj

Sushila Recipe : मराठवाड्याचा लोकप्रिय पदार्थ ‘सुशीला’ बनवा नाश्त्याला, झटपट होणारी रेसिपी लगेच नोट करा

चवीला अप्रतिम आणि बनवायला खूप सोपी असलेला हा पदार्थ तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये किंवा इतर कोणत्याही वेळी भूक लागेल तेव्हा झटपट बनवू शकता.

June 23, 2024 10:12 IST
Follow Us
  • Sushila Recipe In Marathi
    1/9

    नेहमी नेहमी नाश्त्यात काय बनवावं, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. षौष्टिक आणि स्वादिष्ट नाश्ता निवडताना आणखी विचार करावा लागतो. तुम्ही जर दररोज पोहे, उपमा, डोसा, इडली. ढोकळा खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही एखादी हटके रेसिपी करू शकता. (Photo : Social Media)

  • 2/9

    महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये वेगवेगळी खाद्यसंस्कृती पाहायला मिळते. आज आपण मराठवाड्यातील सर्वात लोकप्रिय नाश्त्याची रेसिपी जाणून घेणार आहोत. तुम्ही सुशीलाविषयी ऐकले आहे का? तुम्हाला वाटेल सुशीला म्हणजे काय? तर सुशीला हे एखाद्या मुलीचे नाव नसून पदार्थाचे नाव आहे. (Photo : Social Media)

  • 3/9

    सुशीला हा पदार्थ तुम्ही नाश्त्याला बनवू शकता. मराठवाड्यामध्ये हा पदार्थ सर्वात जास्त प्रमाणात बनविला जातो. चवीला अप्रतिम आणि बनवायला खूप सोपी असलेला हा पदार्थ तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये किंवा इतर कोणत्याही वेळी भूक लागेल तेव्हा झटपट बनवू शकता. हा पदार्थ कसा बनवायचा आणि त्यासाठी कोणते साहित्य घ्यावेत, याविषयी सविस्तर जाणून घेऊ या. (Photo : Social Media)

  • 4/9

    साहित्य
    चुरमुरे, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली मिरची, दाळ, भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट, हिंग, हळद, मीठ, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, मोहरी आणि जिरे (Photo : Social Media)

  • 5/9

    सुरूवातीला दाळ (दालिया) खलबत्त्यात बारीक करून घ्या आणि भरड तयार करा.
    त्यानंतर चुरमुरे घ्यायचे आणि चुरमुऱ्यामध्ये पाणी घालायचं (Photo : Social Media)

  • 6/9

    त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाका, कढीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची टाका आणि कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत चांगला परतून घ्या. (Photo : Social Media)

  • 7/9

    त्यात हळद घाला आणि चांगले मिश्रण एकत्र करा.त्यानंतर पाण्यात भिजवून घेतलेले चुरमुरे टाका आणि सर्व मिश्रण एकजीव करा. (Photo : Social Media)

  • 8/9

    त्यानंतर त्यात डाळीची भरड घाला. त्याचबरोबर शेंगदाण्याचा कुट टाका आणि चवीनुसार मीठ टाका. सर्व मिसळून घ्या. (Photo : YouTube)

  • 9/9

    त्यानंतर त्यावर एक झाकण ठेवून एक वाफ काढून घ्या.वाफ काढल्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.खमंग चवदार सुशीला तयार होईल. (Photo : Social Media)

TOPICS
इंडियन फूडIndian FoodफूडFoodरेसिपीRecipeलाइफस्टाइलLifestyleहेल्दी फूडHealthy Food

Web Title: Marathwada special sushila recipe in marathi how to make sushila ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.