-
मखाना हे ड्रायफ्रूट्स आहे; जे आरोग्यदायी तसेच चवदार सुद्धा आहे. मखाना खाणं आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असल्याने त्यांचा आहारात समावेश असायला हवा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच दुपारच्या किंवा संध्याकाळच्या वेळेत भूक लागते. तेव्हा अनेकदा आई घरात रवा, बेसन, नाचणी, शेंगदाणा आदी विविध प्रकारचे लाडू आवर्जून करून ठेवते. तर आज आपण एका अनोख्या लाडूची रेसिपी पाहणार आहोत ; ज्याचे नाव आहे ‘मखान्याचे लाडू’…(फोटो सौजन्य: @Freepik)
-
‘मखान्याचे पौष्टिक लाडू’ कसे बनवायचे चला पाहू… (फोटो सौजन्य: लोकसत्ता डॉट कॉम / @Freepik )
-
मखान्याचे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी तुम्हाला पाव किलो तीळ, १०० ग्रॅम मखाना, एक वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी सुख खोबरं, अर्धा चमचा जायफळ पूड आणि वेलची पूड, दिड वाटी गूळ आणि तूप हे साहित्य लागेल. . (फोटो सौजन्य: @Freepik)
-
सगळ्यात आधी मखाना, तीळ, शेंगदाणे, सुख खोबरं भाजून घ्या आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या… (फोटो सौजन्य: @Pixabay )
-
एका पॅनमध्ये दोन चमचे तूप घाला आणि त्यात गूळ वितळवून घ्या.(फोटो सौजन्य: @Pixabay )
-
त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं मिश्रण, जायफळ पूड, वेलची पूड तयार गुळाच्या पाकात घाला.फोटो सौजन्य: @Pixabay )
-
मिक्स करून झाल्यावर मिश्रण तयार होईल तसे लगेच लाडू वळून घ्या.फोटो सौजन्य: @Pixabay )
-
अशाप्रकारे तुमचे ‘मखान्याचे पौष्टिक लाडू’ तयार. (फोटो सौजन्य: लोकसत्ता डॉट कॉम)
पावसाळ्यात खा ‘मखान्याचे पौष्टिक लाडू’! चव अन् पोषणही मिळेल; रेसिपी लिहून घ्या लगेच
Monsoon Special Recipes: ‘मखान्याचे पौष्टिक लाडू’ कसे बनवायचे चला पाहू…
Web Title: Monsoon special how to make makhana healthy and tasty ladoo note down marathi recipes and try ones at your home asp