-
अनेक जण पालक पनीर आवडीने खातात. पण, पालकची भाजी खाण्याचा कंटाळा करतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर तुम्हालासुद्धा पालकची भाजी खाण्याचा कंटाळा येत असेल, तर तुम्ही घरच्या घरी ‘हेल्दी पालक राईस’ बनवू शकता आणि आहारात याचा समावेश करू शकता. चला तर पाहूयात हेल्दी पालक राईसची रेसिपी.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
हेल्दी पालक राईस बनवण्यासाठी तुम्हाला एक किलो तांदूळ, पाव किलो मटार दहा ते बारा पालकची पाने, पाव किलो फ्लॉवर, एक गाजर, आलं, दहा ते बारा लसूण पाकळ्या, दहा ते बारा किंवा आवडीनुसार हिरवी मिरची, कोथिंबीर, काळीमिरी, दालचिनी, लवंग, तेजपत्ता, काजू, चवीनुसार मीठ, तेल इत्यादी साहित्य लागेल. (फोटो सौजन्य: युट्युब/ @ProbashiBengaliKitchen)
-
१. सगळ्यात पहिला तांदूळ शिजवून घ्या. तर दुसरीकडे मटार, गाजर, फ्लॉवर भाज्या उकडवून घ्या.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
२. पालक, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीरची मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्या.त्यानंतर फोडणीसाठी एका भांड्यात तेल गरम करून घेणे.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
३. तेल गरम झाल्यावर त्यात थोडे काजू परतवून घेऊन एका प्लेटमध्ये काढून घेणे.नंतर त्या तेलामध्ये तेजपत्ता, काळीमिरी, लवंग, दालचिनी यांना फोडणी देणे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
४. फोडणी दिल्यानंतर त्यात पालकची तयार करून घेतलेली पेस्ट घालणे आणि परतवून घेणे.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
५. नंतर त्यात उकडवून घेतलेल्या भाज्या मटार, गाजर, फ्लॉवर घालून घ्या आणि वरून काजू घाला.त्यानंतर थोडा वेळ झाकून ठेवा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
६. नंतर उकडवून घेतलेला भात मिश्रणात घालून त्यात मीठ घाला आणि थोड्या वेळासाठी मंद आचेवर ठेवा.तुमचा पौष्टिक ‘पालक, मटार राईस’ तयार. (फोटो सौजन्य: @Freepik / युट्युब/ @ProbashiBengaliKitchen)
Palak Rice Recipe: पालकची भाजी खाऊन कंटाळा आला? मग बनवा चविष्ट, पौष्टीक ‘पालक राईस’; नोट करा ही सोपी रेसिपी
Palak Rice Recipe: तुम्ही घरच्या घरी ‘हेल्दी पालक राईस’ बनवू शकता…
Web Title: How to make green spinach or palak pulao or rice note down tasty and healthy marathi recipe and learn how to cook asp