-
लाडूचा आस्वाद घेणारी आपल्यातील अनेक मंडळी आहेत. रवा, बेसन, तीळ, खोबर, बुंदी, शेव आदी अनेक प्रकारचे लाडू केले जातात. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
पण, यामध्ये तुम्ही एक लाडू उपवासासाठी सुद्धा खाऊ शकता. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
उद्या १७ जुलै २०२४ रोजी आषाढी एकादशी आहे. तर यानिमित्त आज आपण शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी साहित्य काय लागेल, त्याची कृती काय असेल जाणून घेऊ. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी तुम्हाला दोन वाट्या शेंगदाणे, एक वाटी सुखं खोबर, एक वाटी गूळ आदी साहित्य लागेल. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
मिक्सरला शेंगदाणे जाडसर बारीक करून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
नंतर यामध्ये सुरीने बारीक करून गूळ, सुख खोबर अर्धी वाटी घाला आणि पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. {आवडीनुसार बदाम, काजू, पिस्ता हे ड्रायफ्रूट्स घालून सुद्धा तुम्ही हे लाडू करू शकता. } (फोटो सौजन्य: @Freepik )
-
त्यानंतर मिश्रण एक ताटात काढून घ्या आणि लाडू वळण्यास सुरुवात करा . (फोटो सौजन्य: @Freepik )
-
अशाप्रकारे तुमचे ‘शेंगदाण्याचे लाडू’ तयार. (फोटो सौजन्य:@Pixabay / @Freepik )
Shengdana Laadoo Recipe: फक्त तीन पदार्थ वापरून करा शेंगदाण्याचा लाडू; उपवासासाठी ठरेल बेस्ट पर्याय; साहित्य, कृती पाहा
Shengdana Laadoo Recipe: आज आपण शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत…
Web Title: Shengdana laadoo how to make this recipe in just fifteen minutes note down step by step marathi recipe asp