-
अनेक प्रकारच्या मिठाई आणि पारंपारिक पदार्थ बनवण्यासाठी गुळाचा वापर केला जातो. या व्यतिरिक्त गूळ खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे देखील होतात, पण तुम्हाला माहित आहे का की गूळ त्याच्या चवीसोबतच तुमच्या केसांना आणि त्वचेलाही अनेक फायदे देऊ शकतो? केसांची आणि त्वचेची काळजी करण्यासाठी गुळाचा समावेश कसा केला जाऊ शकतो.
-
त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही गुळाचा वापर नैसर्गिक एक्सफोलिएंट म्हणून करू शकता. गुळात ग्लायकोलिक ॲसिड आढळते, जे त्वचेची लवचिकता टिकवून ठेवण्यास मदत करते, गूळ त्वचेच्या मृत पेशी काढून टाकते आणि त्वचा चमकदार ठेवते. यासाठी गूळ बारीक वाटून त्यात थोडे मध आणि काही थेंब लिंबाचा रस घाला. तयार मिश्रणाने तुमच्या चेहऱ्यावर मसाज करा, नंतर कोमट पाण्याने धुवा. हे स्क्रब तुमची त्वचा मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी प्रभावी ठरू शकते. -
गुळातील अँटिऑक्सिडंट गुणधर्म मुक्त रॅडिकल्सशी लढा देऊन त्वचेवर दिसणारी वृद्धत्वाची चिन्हे कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. तुम्ही चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या येण्याची समस्या कमी करण्यासाठी गूळ पावडरचा वापर करू शकता. यानंतर या पावडरमध्ये अर्धे मॅश केलेले केळी आणि एक चमचा दही मिसळून फेस मास्क तयार करा. हा मास्क चेहऱ्यावर लावा आणि १५-२० मिनिटे राहू द्या. काही वेळेनंतर, तोंड पाण्याने धुवा. हा मास्क तुमच्या त्वचेचे पोषण करण्यासाठी आणि वृद्धत्व कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
-
गुळातील दाहक-विरोधी गुणधर्म मुरुम कमी करण्यास मदत करतात. गुळ रक्त डिटॉक्स करण्यास देखील मदत करतात, ज्यामुळे त्वचा स्वच्छ राहते. यासाठी तुम्ही दररोज गुळाचा एक छोटा तुकडा खाऊ शकता किंवा गुळापासून तयार केलेला हर्बल चहा घेऊ शकता.
-
गुळामध्ये लोह आणि फोलेटचे प्रमाण असते, जे रक्त परिसंचरण वाढवण्यासाठी प्रभावी ठरते. ज्यामुळे केसांच्या वाढीस चालना मिळते. तुम्ही केसांना वाढवण्यासाठी गुळाचे सेवन करण्यासोबतच त्याची पावडर बनवून, खोबरेल तेलात मिसळून केसांना हलकी मालिश करू शकता. हे मिश्रण टाळूवर सुमारे ३० मिनिटे राहू द्या आणि नंतर शॅम्पूने केस पूर्णपणे स्वच्छ करा.
-
गुळाचा नियमित वापर केल्याने केसांना नैसर्गिक चमक मिळते, केस निरोगी आणि चमकदार दिसतात. यासाठी गरम पाण्यात गूळ विरघळवून केसांनी लावा. यामुळे केसांना सुंदर चमक आणण्यास मदत होते. -
गुळातील अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजे तुमच्या केसांचा नैसर्गिक रंग राखण्यात आणि अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध करण्यास मदत करू शकतात. यासाठी आवळा पावडर आणि पाण्यात गुळ मिसळून हेअर मास्क बनवू शकता. या मिश्रणामुळे केसांचे आरोग्य चांगले होते. (फोतो-फ्रीपिक)
Skin Care: केस आणि त्वचेसाठी गूळ आहे वरदान! ‘या’ सोप्या पद्धतीने मिळतील आश्चर्यकारक फायदे…
तुम्ही त्वचेची काळजी घेण्यासाठी गुळाचा वापर नैसर्गिक एक्सफोलिएंट म्हणून करू शकता. जाणून घेऊया यासाठी काही सोप्या पद्धती.
Web Title: Jaggery is a boon for hair and skin this is easy way to get amazing benefits arg 02