-
पावसाळा ऋतू सुरू झाला असला तरीही काही ठिकाणी मात्र उष्णता जाणवते आहे. तर ही उष्णता आपल्या आरोग्यावर परिणाम करू शकते. पण, काही पदार्थ, फळे व पेये आपल्याला उत्साही राहण्यास मदत करू शकतात. (फोटो सौजन्य: @freepik)
-
‘अंजीर मिल्क शेक’. हे एक असे पॉवरपॅक मिल्क शेक आहे, जे पोषक घटकांनी भरलेलं आहे. तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर तुमच्यासाठी कन्टेन्ट क्रिएटर आरती सहानीने अतिशय सोपी, सुपर हेल्दी मिल्क शेकची रेसिपी सांगितली आहे. (फोटो सौजन्य: @freepik)
-
अंजीरचे मिल्क शेक कसे बनवायचे?
२०० मिली कमी चरबीयुक्त दूध, दोन भिजविलेल्या सब्जाच्या बिया, २० ग्रॅम अंजीर (भिजवलेले), १-२ भिजवून, चिरलेले बदाम, इलायची पावडर (पर्यायी) आदी साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून व्यवस्थित बारीक करून घ्या. अशा प्रकारे मिल्क शेक तयार होईल. (फोटो सौजन्य: @freepik) -
एक ग्लास मिल्क शेकमध्ये एकूण १५० कॅलरीज असतात. यामध्ये प्रथिने ७.८ ग्रॅम, फायबर २.५ ग्रॅम, कर्बोदके २३.२ ग्रॅम असतात. (फोटो सौजन्य: @freepik)
-
हे पेय त्वरित ऊर्जा, उत्तम पोषण व थंडावायुक्त चव, असे एकाच वेळी तीन फायदे मिळवून देते. ”अंजीर मिल्क शेक एक नैसर्गिक गोडवा व शरीराला फायबर देते आणि सब्जाच्या बिया थंडावा आणि महत्त्वपूर्ण खनिजे शरीराला पुरवतात. (फोटो सौजन्य: @freepik)
-
याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी दी इंडियन एस्क्प्रेसने धरमशिला नारायणा हॉस्पिटलच्या वरिष्ठ आहारतज्ज्ञ पायल शर्मा यांच्याशी संवाद साधला. अंजीरचे मिल्क शेक शरीराला ताजेतवाने, पौष्टिक, हायड्रेटिंग ठेवण्यास मदत करते. अंजीरमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स असतात. (फोटो सौजन्य: @freepik)
-
आहारतज्ज्ञ पायल शर्मा पुढे म्हणाल्या की, अंजीरच्या नैसर्गिक गोडपणाचा अर्थ असा आहे की, आपल्याला अतिरिक्त साखरेची गरज लागत नाही. (फोटो सौजन्य: @freepik)
-
कन्टेन्ट क्रिएटर आरती सहानी यांच्या म्हणण्यानुसार, शरीरातील उष्णता दूर करण्यासाठी अंजीर रात्रभर भिजविणे उत्तम ठरेल. अंजीर पाण्यात भिजविल्याने शरीराला ते चांगल्या प्रकारे आत्मसात करण्याच्या दृष्टीने मदत होते. (फोटो सौजन्य: @freepik)
-
वजन कमी करू पाहणाऱ्यांचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्यांसाठी मिल्क शेक हा उत्तम पर्याय ठरेल. कारण- त्यात प्रत्येक सर्व्हिंगमध्ये फक्त १५० कॅलरीज असतात. त्याशिवाय त्यात प्रथिने, फायबर, उपयुक्त चरबी, कर्बोदके यांचे संतुलित मिश्रण असते, असे जिंदाल नेचरक्योर इन्स्टिट्यूटच्या एन. एम. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बाबिना म्हणाल्या आहेत. (फोटो सौजन्य: @freepik)
अंजीर ठरेल का वजन कमी करण्यासाठी बेस्ट पर्याय? एक ग्लास अंजीर मिल्क शेकमध्ये कॅलरीज किती ? जाणून घ्या
Anjeer Milkshake: वजन कमी करू पाहणाऱ्यांचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्यांसाठी मिल्क शेक हा उत्तम पर्याय ठरेल. कारण- त्यात प्रत्येक सर्व्हिंगमध्ये फक्त…
Web Title: Anjeer milkshake is it good for weight watchers beacuse150 calories per serving and has a well balanced combination of protein fibre fat and carbs asp