-
सुंदर त्वचा मिळविण्यासाठी आणि चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी आपण अनेकदा बाजारातील महागड्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतो.
-
पण आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा वापर करून चेहऱ्याच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते.
-
त्याचप्रमाणे असेही एक झाड आहे ज्याची पाने चघळल्याने चेहऱ्यावरील घाण साफ होऊ शकते.
-
ही पाने म्हणजे कडुलिंब. कडुलिंबाची पाने कडू असली तरी त्यामुळे चेहऱ्याशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका होण्यास मदत होऊ शकते.
-
कडुलिंबाचे आयुर्वेदात विशेष महत्त्व आहे. कडुनिंबाच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा म्हणजेच त्याची फुले, डहाळ्या, मुळे आणि सालापासून ते पानांपर्यंत आयुर्वेदात औषध म्हणून वापर होतो.
-
जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील फोडांमुळे आणि काळ्या डागांमुळे त्रस्त असाल तर कडुलिंबाची पाने नियमितपणे चघळणे सुरू करा. हे रक्त शुद्ध करण्याचे काम करते, त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो.
-
कडुनिंबाच्या पानांमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म चांगल्या प्रमाणात आढळतात, ज्याच्या सेवनाने पिंपल्स आणि एक्जिमा सारख्या समस्यांपासून आराम मिळतो. कडुलिंबाच्या पानांचे नियमित सेवन केल्याने त्वचा आणि चेहऱ्यावरील घाण साफ होते.
-
कडुलिंबाच्या पानांची पेस्टही चेहऱ्यावर लावू शकता. यासाठी कडुलिंबाची पाने बारीक करून त्यात दोन चमचे दही घालून पेस्ट तयार करा आणि नंतर चेहऱ्यावर लावा. काही वेळ पाण्याने धुवा. यामुळे त्वचा चमकदार होते.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. (सर्व फोटो : फ्रीपिक)
Skin Care Tips: चेहऱ्यावरील सर्व समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ एकच पान ठरेल प्रभावी; जाणून घ्या कसा करावा वापर
Skin Care Tips: आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा वापर करून चेहऱ्याच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते.
Web Title: Eating the leaves of this tree can clean the dirt and spots on the face jshd import pvp